
शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी गावातील लक्ष्मीनगर जवळील हॉटेल कलासाईच्या मागे, अमरधामचे भिंतीच्या आडोश्याला दोन इसमांना चिलीम पीत असताना पकडण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती की, शिर्डी येथील अमरधामच्या भिंतीच्या आडोशाला दोन जण तोंडातुन चिलमीच्या सहाय्याने धुर काढतांना बसलेले दिसुन आल्याने पोलीसांनी सदर इसमांना जागीच पकडुन त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) दत्तात्रय भास्कर मोरे, वय 50 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी ता. राहाता व शुभम सुनिल पवार, वय 28 वर्षे, रा. साकुरी ता. राहाता असे असल्याचे सांगितले
असुन सदर इसमांच्या तोंडांचा उग्र वास येत असल्याने पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी तुम्ही येथे काय करत आहेत ? असे विचारले असता त्यांनी आम्ही चिलमीच्या सहाय्याने गांजा पित असल्याचे कबुल केले आहे. त्यावेळी सदर इसमांची पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी दोन पंचांसमक्ष अंग झडती घेता त्यांचे जवळ काळ्या रंगाची गांजा ओढण्यासाठी लागणारी मातीची चिलीम ,राजन ,अर्धवट
मळकट पांढरे रंगाचे तळहाताच्या आकाराचे कापड काड्याची पेटी,वरील वर्णनाचा साहित्य वरील नमुद इसम यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांचा दोन पंचासमक्ष पोहेकॉ/2171 गोमसाळे यांनी लॅपटॉपवर सविस्तर पंचनामा टाईप करून वरील साहित्य व साधने जागीच नाश केले आहे. नमुद इसमांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले, अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.