Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
शिर्डी

श्री साईबाबा हॉस्पिटलने कार्डीयाक सर्जरीमध्‍ये केला २० हजार रुग्‍णांचा टप्‍पा पार

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कार्डीयाक विभागाने हॉस्पिटल स्‍थापनेच्‍या सन २००६ पासुन आजपर्यंत २० हजार रुग्‍णांच्‍या शस्‍त्रक्रियेचा टप्‍पा पार केला आहे. यानिमीत्‍त श्री साईबाबा हॉस्पिटलध्‍ये दि. १४ ऑगस्‍ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा समारंभाचे आयोजन करणेत आले होते.
या समारंभात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी , गोरक्ष गाडीलकर ,भा.प्र.से कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणुन उपस्‍थीत होते. यावेळी बोलताना त्‍यांनी कार्डीयाक सर्जरी विभागामध्‍ये आतापर्यंत योगदान दिलेल्‍या सर्व डॉक्‍टर कर्मचारी नर्स यांचे अभिनंदन करुन तुमच्‍या अथक योगदानातुनच श्री साईबाबा हॉस्पिटलने हा यशस्‍वी टप्‍पा पार केला असुन अशाच प्रयत्‍नातुन तुमच्‍या हातुन अनेक रुग्‍णांचे आयुष्‍य वाढवायचे काम व्‍हावे यातुन श्री साईबाबांनी दिलेला रुग्‍ण सेवा हिच ईश्‍वरसेवा या शिकवणीनुसार तुम्‍ही कार्यरत राहुन अशाच प्रकारचे रुग्‍ण सेवेचा वसा यापुढे चालु रहावा यासाठी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्‍टर व कर्मचा-यांनी प्रयत्‍न करावे असे आवाहन करुन कार्डीयाक सर्जरी विभागाच्‍या कामाचे कौतुक केले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते कार्डीयाक सर्जरी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्‍टरांचे व संबधीत नर्सिंग कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देवुन सन्‍मान करणेत आला. डॉ. महेश मिस्‍तरी, डॉ.विद्युतकुमार सिन्‍हा, डॉ.विजय नरोडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करुन कार्डीयाक सर्जरी विभागाच्‍या या यशाचा आलेख यावेळी मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर मांडला.
या प्रसंगी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुलवळे, , उपवैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, कार्डीयाक सर्जन, डॉ.महेश मिस्‍तरी, डॉ.विद्युतकुमार सिन्‍हा, कार्डीओलॉजीस्‍ट डॉ.संदिप देवरे, न्‍युरो सर्जन, डॉ.मुकुंद चौधरी, फिजीशिअन डॉ.अजिंक्‍य ढाकणे, अतिदक्षता तज्ञ डॉ.विजय नरोडे, भुलतज्ञ, डॉ.संतोष मराठे, डॉ.संतोष सुरवसे, डॉ.निहार जोशी, डॉ.गायत्रीलक्ष्‍मी नागपुरे, सहा.अधिसेविका मंदा थोरात यांच्‍यासह रुग्‍णालयातील सर्व डॉक्‍टर्स कर्मचारी, रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक उपस्‍थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक सुरेश टोलमारे जनसंपर्क अधिकारी रुग्‍णालये यांनी केले, सुत्रसंचालन शकरानंद ओहोळ यांनी केले तर मान्‍यवरांचे आभार डॉ.प्रितम वडगावे उप वैद्यकीय संचालक यांनी मानले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button