Letest News
ड्रग्स स्फोटाने राजकारण पेटलं-सुजय विखेंचं पोलिसांना अल्टिमेटम “गुंड दीपक पोकळेच्या कार्यालयाचे उद्घ... “शिर्डीत पोलिसांचा रौद्रावतार-वेश्या व्यवसाय करणार्‍या गुन्हेगारांवर कायद्याची वज्रकाठी पीटा अंतर्गत... सिंहस्थ कुंभमेळा : शिर्डीच्या विकासाला सुवर्णसंधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीत विकासाचा महायज्ञ झाडू ते चेअरमन – संघर्षाला सन्मान देणाऱ्या नेतृत्वाला ‘दैनिक साईदर्शन’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक श... नशेच्या इंजेक्शन विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११-६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त-एकास अट... अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्का-म्पीडीएचा बडगा संगमनेर दौऱ्यात डॉ. पंकज आशियांचे कडक आदेश अखेरचा भगवा सलाम! शिर्डी शहर शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदार सुनीलभाऊ परदेशी यांचे निधन टाटा मोटर्सचा उदार हात! २५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द शिर्डी पोलीस स्टेशनने ‘दैनिक साई दर्शन’च्या बातमीची घेतली दखल सुगंधित तंबाखू विक्रीप्रकरणी छापा- ४-९... भाच्यानेच केला मामाचा खून! स्थानिक गुन्हे शाखेची 15 दिवसांच्या तपासानंतर उकल
अ.नगरराजकीय

’मिशन ७५ टक्के’ अंतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम

अहिल्यानगर दि.२०- विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारसंघात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘मिशन ७५ टक्के’ अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जिल्ह्याने मतदार जागृती उपक्रमासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विविध वयोगटातील आणि क्षेत्रातील नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वीदेखील जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमांचे विविध पातळीवर कौतुक करण्यात आले आहे.

स्वीप उपक्रमात जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, पुरस्कारप्राप्त खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, ग्रंथालये यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. २२ ऑक्टोबर रोजी ‘डेमोक्रसी ऑन व्हिल’ उपक्रमाद्वारे या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. याअंतर्गत सायकल फेरीचे आयोजन करण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात येणार आहे.

‘माय एपीक, माय बाईक’ उपक्रमाच्या माध्यमातून २३ ऑक्टोबर रोजी मतदार ओळखपत्राचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरला नागरिकांच्या सहभागातून लोकशाही दौडचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर रोजी आयोजित हेाणाऱ्या जनजागृती प्रभातफेरीत खेळाडू, सामाजिक संस्था, ग्रंथालयांचे सदस्य सहभागी होतील. २६ ऑक्टोबर रोजी मान्यवरांचे संदेश समाज माध्यमांद्वारे देण्यात येणार आहेत.

‘सर्वसमावेशक मतदान’ या संकल्पनेनुसार उपक्रमात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीत मतदान करणे आवश्यक असून नागरिकांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजवावा आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रेरित करण्यासाठी मतदान जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button