Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
अ.नगरराजकीय

शिवसेना सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते

शिर्डी( प्रतिनिधी) शिवसेना( शिंदे गट) सदस्य नोंदणी अभियान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी प्रमुख व शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे प्रारंभ करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी, शिवप्रेमींनी ,महिलांनी, युवतींनी शिवसेना सदस्य नोंदणी करून घ्यावी व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .असे आवाहान अहिल्यानगर उत्तर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते व नितीनराव औताडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार श्री एकनाथ रावजी शिंदे यांचे आदेशाने व शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येत आहे. नाशिक जिल्हा, अहिल्यानगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून नाशिकचे जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्यावर तशी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ,महिला आघाडी, युवा सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक तसेच शिवकार्य शिवसेना नोंदणी ही शिवसेनेचे उपनेते अजयजी बोरस्ते,मा.खा. सदाशिव लोखंडे आमदार विठ्ठलराव लंघे ,आमदार अमोल खताळ, प्रभाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे होणार आहे.

तरी या बैठकीला व नोंदणी अभियान प्रारंभ कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी ,सदस्यांनी , युवक ,युवती व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन अहिल्यानगरचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते तसेच
नितीनराव औताडे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button