Letest News
शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 — विखे घराण्याच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण! ६० टक्के नवीन चेहरे — नागर... प्रभाग क्रमांक २ मध्ये “अमृत गायके” यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग ५ मध्ये “नितीनभाऊ शेजवळ” यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ मध्ये “संदीप भाऊ सोनवणे” यांच्या नावावर जनतेचा विश्व... प्रभाग क्रमांक २ मधून सौ. शोभाताई राजेंद्र कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राहात्यात धाडसी चोरी! – पान दुकानाचे शटर फोडून दोन लाखांहून अधिक रक्कम लंपास इंजेक्शनकांड भाग–२ “सावळीविहीर येथील डॉक्टराची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली गंभीर दखल ? शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची ज... आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी — निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या गाड्या आता रस्त्यावर — सुरक्षा धोक्यात!
अ.नगरशिर्डी

shirdi news:-श्री साईबाबा संस्थान राबविणार सामाजिक आरोग्य शिबिरे !

Shri Saibaba Sansthan will conduct social health camps!

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे त्याच आवाहनला प्रतिसाद म्हणून श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे ठरवले असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या उपक्रमांतर्गत शिर्डी परिसरातील ४० गावा मध्ये ही सामाजिक आरोग्य शिबिरे संस्थान रुग्णालयांमार्फत राबविण्यात येणार आहे. यामध्‍ये दहेगाव, जवळके, खडकेवाके, मंजुर, अंजनापुर, काकडी, कोकमठाण, संवत्सर, वारी कान्हेगाव, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, पिंपळस, केलवड, पोहेगाव, साकुरी, नांदुखीं, को-हाळे, डो-हाळे, वाळकी, पिंपळवाडी, सावळीविहीर, निमंगाव को-हाळे, कनकुरी, रुई, पुणतांबा, रस्तापुर, वाकडी

, रामपुरवाडी, जळगाव, शिंगवे, दहेगाव बोलका, भोजडे, चितळी, अस्तगाव, एकरुखे, चोळकेवाडी, मढी, गणेशनगर, शिर्डी या राहाता व कोपरगाव तालुक्यातील निवड केलेल्या चाळीस गावातील नागरिकांशी श्री साईबाबा संस्थान व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येऊन त्या गावांमध्ये सामाजिक आरोग्य शिबिरे पार पडणार आहे. सदर शिबीरामध्ये ईसीजी तपासणी, रक्त तपासणी करणेत येवुन आजाराचे निदान झालेल्या रुग्णावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातुन मोफत उपचार करणेत येणार आहे.


ही सामाजीक आरोग्य शिबीरे राबविणेकरीता श्री साईबाबा संस्थान रुग्णालयांनी फिरते वैद्यकीय आरोग्य तपासणी पथक तयार केले आहे. दि.०३ सप्‍टेंबर २०२४ रोजी या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून सामाजिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ केला.

या प्रसंगी उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, अधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, समाजसेविका शोभा गाडेकर सोनल नागपुरे, ईडीपी मॅनेजर साईप्रसाद जोरी बायो मेडिकल वेस्ट मॅनेजर सचिन टिळेकर, कॅम्प कॉर्डिनेटर सुनील लोंढे यांच्यासह दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर, टेक्निशियन, नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते. यासाठी संस्थान रुग्णालयातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.


तरी या शिबिराच्या माध्यमातून आपली आरोग्य तपासणी शिबीराच्या दिवशी संबंधित गावातील रहिवासी नागरिकांनी करून घ्यावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button