Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी!

शिर्डीतील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात अजूनही माजातच असल्याचे समोर आले आहे. सलग पाच दिवसांच्या पोलीस चौकशीत तपास यंत्रणांनी आर्थिक व्यवहार, दस्तऐवज आणि संबंधित साक्षीदारांची कसून पडताळणी केली. मात्र, समोरासमोर चौकशीदरम्यान खरातने थेट साक्षीदारांनाच धारेवर धरत दमदाटी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.’

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलीस ठाण्यातच संतापाचा स्फोट; साक्षीदारांवर खापर फोडण्याचा प्रयत्न ⚠️
पोलिसांनी साक्षीदार सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी तसेच मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांना अशोक खरातसमोर बसवून व्यवहाराबाबत चौकशी केली. यावेळी खरात संतापून “तुमच्यामुळेच मी वादात अडकलो,” असा सूर लावत साक्षीदारांवरच जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस ठाण्यातच त्याची आक्रमक भाषा पाहून उपस्थितांमध्येही चर्चा रंगली.
‘तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून गप्प केले’; साक्षीदारांचा खरातवर पलटवार 🔥
या समोरासमोर चौकशीत साक्षीदारही आक्रमक झाले होते. “व्यवहार रद्द करण्याची मागणी आम्ही आधीच केली होती. मात्र, त्यावेळी तुम्ही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून आम्हाला गप्प बसवलं. आता प्रकरण अंगलट आल्यानंतर आम्हालाच जबाबदार का धरता?” असा थेट सवाल साक्षीदारांनी खरातला केला. या प्रश्नांनंतर काही काळ चौकशीचे वातावरण चांगलेच तापल्याचे समजते.


आर्थिक व्यवहारांच्या धागेदोऱ्यांवर पोलिसांचा फोकस; कोठडी संपणार 🕵️‍♂️
तपास यंत्रणांनी जमीन व्यवहारातील पैशांचा प्रवाह, बनावट कागदपत्रांची शक्यता आणि व्यवहारातील मध्यस्थांची भूमिका यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिसांकडून अनेक दस्तऐवजांची बारकाईने छाननी सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक खरातची पोलीस कोठडी शनिवारी संपत असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button