Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगर

साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सन्मान

शिर्डी,
श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

रघु सुंदरम हे “ओस्टिओजेनिसिस इम्परफेक्टा” या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त असूनही, साईसेवेच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हाडे सहज फ्रॅक्चर होतात, सांधे सैल असतात आणि उंचीवर मर्यादा येते. तरीही त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवर मात करत, श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रसार आपले ध्येय मानले आहे.

सुमारे १५ वर्षांपूर्वी एका अपघातानंतर त्यांना आलेल्या अध्यात्मिक साक्षात्काराने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. त्यांनी श्री साई सच्चरित्राचे रोज पारायण करण्याची नित्य दिनचर्या अंगीकारली. इतकेच नव्हे तर त्यांनी साईभक्तांचा सामूहिक प्रार्थना समूह स्थापन करून शेकडो भाविकांना साईमार्गाशी जोडले.

साईसंदेशाचा प्रचार-प्रसार करत असताना त्यांनी श्री साई सच्चरित्राच्या तमिळ भाषांतर व संपादन कार्यातही मोलाचा सहभाग दिला आहे. दरवर्षी शिर्डी येथे येऊन श्री साईंबाबांच्या समाधीचे दर्शन घेणारे रघु सुंदरम आपल्या कमाईतील मोठा हिस्सा साई संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करतात – ही त्यांची सेवा भाविकांना अतीव प्रेरणा देणारी आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी रघु सुंदरम यांच्याशी संवाद साधत त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला .
संकटांवर मात करत, अध्यात्माच्या आधाराने समाजसेवा करणाऱ्या रघु सुंदरम यांचे कार्य खरोखरच श्री साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” या शिकवणीचे ज्वलंत उदाहरण ठरते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button