Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
क्राईमशिर्डी

शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास

Shirdi येथे साईदर्शनासाठी आलेल्या तामिळनाडूतील भाविकांच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी Shirdi Police Station येथे भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मोहनसुंदरम सुब्रमणी (रा. इरोड, तामिळनाडू) हे आपल्या कुटुंबासह तसेच मित्र परिवारासोबत इनोव्हा क्रिस्टा (TN 36 CY 0808) गाडीतून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. 28 एप्रिल रोजी सकाळी धनतारा चौक परिसरात हॉटेल धनतारासमोरील मोकळ्या जागेत गाडी पार्क करून सर्वजण दर्शनासाठी गेले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दुपारी सुमारे 3 वाजता फिर्यादी गाडी घेण्यासाठी परत आले असता गाडीच्या मधल्या सीटजवळील काच फुटलेली दिसली. गाडीतील सामानाची उचकापाचक झालेली होती. तसेच हॅण्डबॅग, तीन मोबाईल, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे उघड झाले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 17 हजारांची रोख रक्कम, सॅमसंग व वन प्लस कंपनीचे तीन मोबाईल, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक, विविध बँकांचे एटीएम व क्रेडिट कार्ड तसेच हेल्थ इन्श्युरन्स कार्डांचा समावेश असून एकूण नुकसान सुमारे 38 हजार 500 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
साईनगरीत दिवसाढवळ्या पर्यटकांच्या गाड्यांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. शिर्डी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button