Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
राजकीयशिर्डी

शिर्डीचा अभिमान! कु. चैत्राली सिनगरची राज्यस्तरीय Inspire MANAK गोंदिया प्रदर्शनासाठी निवड – विज्ञानविश्वात साईनगरीची जोरदार दणका!

शिर्डी :
श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मीडियम स्कूलला अभिमानाने उजळवणारी कामगिरी करत आठवीत शिकणारी कु. चैत्राली विलास सिनगर हिने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विश्वात आपली कल्पकता, अभ्यासू वृत्ती आणि धडाडी दाखवत राज्यस्तरीय Inspire MANAK (गोंदिया) प्रदर्शनात स्थान मिळवले आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीवर शिर्डी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

sai nirman
जाहिरात

जिल्हास्तरावर चमकली… राज्यस्तरावर धडक देण्यासाठी सज्ज!

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नेवासा फाटा येथे आयोजित Inspire MANAK जिल्हास्तरीय प्रदर्शनात DLEPC मध्ये चैत्रालीने सादर केलेला अभिनव प्रकल्प परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.
विज्ञानाधारित नवकल्पना, अचूक सादरीकरण आणि विषयाचे अतिशय समजूतदारपणे केलेले विश्लेषण पाहून परीक्षकांनी चैत्रालीची निवड राज्यस्तरावर गोंदिया येथे होणाऱ्या अंतिम प्रदर्शनासाठी केली.

DN SPORTS

ही निवड म्हणजे फक्त चैत्रालीचेच नव्हे, तर संपूर्ण साईनगरीचे यश ठरले आहे.


शाळेचे घनदाट मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे योगदान

कु. चैत्रालीच्या या यशामध्ये
शाळेचे प्राचार्य श्री. आसिफ तांबोळी,
मुख्याध्यापिका सौ. शिल्पा पुजारी,
तसेच विज्ञान विभागातील सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणा आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले.
विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांची ही मोठी फलश्रुती आहे.

तिचे पालक विलास सिनगर यांचे प्रोत्साहन आणि घरी मिळालेले वातावरणही चैत्रालीच्या यशामागचे मोठे कारण ठरले.


संस्थानकडून भव्य अभिनंदन – शिर्डीचा मान अधिक उंचावला

kamlakar

या विशेष यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.),
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे,
प्र. प्रशासकीय अधिकारी श्री. विश्वनाथ बजाज,
तसेच संपूर्ण शिक्षकवर्गाने चैत्रालीचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

शिर्डीच्या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर पोहोचल्याने साईनगरीचा लौकिक आणखी वाढला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button