Letest News
काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; डॉ. सुजय विखे यांचा जयश्रीताई व विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते शिर... शिर्डीचे भूमिपुत्र कमलाकर कोते यांनी योगगुरू बाबा रामदेव यांची घेतली सदिच्छा भेट shirdinews#शिर्डीत मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा-70 डॉक्टरांचा उत्साही सहभा... shirdinews# शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या लोगोचे अनावरण संजय आप्पा शिंदे पाटील यांना मानाचा सत्कार कोपरगाव तालुका पोलीस ठाणे इमारत व 64 कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण #मराठीबातम्या वाढदिवसानिमित्त चक्क ४६ लाखांचे सोने साईचरणी अर्पण३०९ ग्रॅम वजनाचे ६ सुवर्ण ‘ॐ’ अक्षर ... शिर्डीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला-माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा रस्त्याकडेला उभ्या महिलेवर डोळा-पिंपळवाडी–रुई मार्गावर संतापजनक प्रकार दोन हजारांचे आमिष दाखवत विवाह...
राजकीयशिर्डी

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; डॉ. सुजय विखे यांचा जयश्रीताई व विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते शिर्डीत सत्कार

शिर्डी (वार्ताहर) :
भारतीय जनता पक्षाचे खासदार  डॉ. सुजय विखे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच त्यांच्यावर केरळ विधानसभा निवडणुकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याबद्दल शिर्डी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.शिर्डीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई व विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते  प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत डॉ. सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यांच्या या नियुक्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार म्हणून संसदेत तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे. त्यांची कार्यपद्धती, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

त्याचबरोबर आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे झालेल्या भेटीत नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी डॉ. विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्य आणि देशाच्या राजकारणात त्यांनी प्रभावी कामगिरी करत पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


या प्रसंगी विष्णू थोरात हे देखील उपस्थित होते. त्यांनीही डॉ. सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना मिळालेली ही जबाबदारी अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button