Letest News
शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 — विखे घराण्याच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण! ६० टक्के नवीन चेहरे — नागर... प्रभाग क्रमांक २ मध्ये “अमृत गायके” यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग ५ मध्ये “नितीनभाऊ शेजवळ” यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ मध्ये “संदीप भाऊ सोनवणे” यांच्या नावावर जनतेचा विश्व... प्रभाग क्रमांक २ मधून सौ. शोभाताई राजेंद्र कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राहात्यात धाडसी चोरी! – पान दुकानाचे शटर फोडून दोन लाखांहून अधिक रक्कम लंपास इंजेक्शनकांड भाग–२ “सावळीविहीर येथील डॉक्टराची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली गंभीर दखल ? शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची ज... आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी — निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या गाड्या आता रस्त्यावर — सुरक्षा धोक्यात!
अ.नगरराजकीय

वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत मारहाण

वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत मारहाण करण्यात आली आहे. सचिन चव्हाण यांना काळे फासत शैलेश कांबळे म्हणाले, ”सचिन चव्हाण यांनी जो काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो. बाळासाहेब आंबेडकरांना धोका या सचिन चव्हाण याने दिला आहे”,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असे म्हणत शैलेश कांबळे यांनी चाबकाने मारहाण केली आहे.अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले.

तसेच बाळासाहेब आंबेडकरांना धोका दिला म्हणत त्यांनी सचिन चव्हाण यांना चाबकाने फटके मारले असल्याचे समोर आले आहे.विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्वच भागांमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात येत आहेत.

तसेच इतर पक्षांकडून व अपक्ष उमेदवारांकडून देखील पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणात आता तिसरी आघाडीने देखील उडी घेतली आहे. आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button