Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
राजकीयशिर्डी

साई संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे चोरी गेलेली मोटरसायकल मूळ मालकाला मिळाली परत!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत संस्थानच्या एका अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे चोरी गेलेली मोटरसायकल मालकाला परत मिळाली‌आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे कार्यकारी अभियंता दाभाडे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी साईनगर येथे बिल्डिंग समोर एक मोटर सायकल बरेच दिवसांपासून बेवारस पडून आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मालकाचा शोध घेता आला तर बघा. असे सुरक्षा विभागाला सांगून त्यांनी गाडीचा फोटो पाठवला. गाडीचा क्रमानं एम. एच 15 डी आर 5848 असा असून होंडा युनिकॉर्न होती. गाडीच्या मागील नंबर प्लेट वर वर्धमान मोटर्स( होंडा शोरूम )पिंपळगाव असा शोरूम चा पत्ता होता. शोरूम ला संपर्क करून मोटोरसायकल मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक मिळवला.

पण मोबाईल क्रमांक बंद होता. मालकाचे नाव काशिनाथ विठोबा गायकवाड रा. पिंपरी ता. निफाड जि. नाशिक असे होते. नंबर बंद असल्यामुळे आमच्याकडून संपर्क झाला नाही. त्यावेळी वर्धमान मोटर्स पिंपळगांव चे संचालक श्री. संजय छाजेड यांनी संबंधित गावात संपर्क करून गाडी मालकाचा मुलाचा नंबर मिळवून दिला.

आज रोजी मालक गाडी घ्यायला आले त्यांनी सांगितले की, पुणे येथे मुलगा कॉलेज ला होता म्हणून त्याला गाडी दिली होती. परंतु एक वर्षांपूर्वी तेथून गाडी चोरी झाली होती. चोरी झालेली गाडी परत मिळेल अशी किंचितही अपेक्षा नव्हती. परंतु साईबाबांच्या कृपेने गाडी परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

आज त्यांची होंडा युनिकॉर्न मोटार सायकल ताब्यात दिली. श्री साईबाबा संस्थान चे कार्यकारी अभियंता दाभाडे साहेब व वर्धमान मोटर्स चे संचालक श्री संजय छाजेड यांच्यामुळे चोरी झालेली गाडी मूळ मालकांच्या ताब्यात देता आली. संस्थांनच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे व दक्षतेमुळे ही चोरीची गाडी मूळ मालकाला परत मिळाल्यामुळे संस्थांनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा विभागाचे अभिनंदन होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button