Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमशिर्डी

रस्त्याकडेला उभ्या महिलेवर डोळा-पिंपळवाडी–रुई मार्गावर संतापजनक प्रकार दोन हजारांचे आमिष दाखवत विवाहितेचा हात पकडला- वासनेच्या हैवानाची निर्लज्ज कृत्य!

वासनेच्या हैवानाचे धाडस! रस्त्याकडेला उभ्या विवाहितेचा हात धरून दोन हजारांचे आमिष
शिर्डी | दि. २ मार्च २०२६
पिंपळवाडी–रुई मार्गावरील रेल्वे बोगद्याजवळ दुपारच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या कडेला एकटी उभ्या असलेल्या २४ वर्षीय विवाहित महिलेचा हात पकडून तिला मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडत दोन हजार रुपयांचे आमिष दाखविण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेचे नाव कायदेशीर कारणास्तव जाहीर करण्यात आलेले नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता सदर महिला आपल्या पतीसमवेत पिंपळवाडी येथून रुईकडे नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यामुळे महिला रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभी राहिली, तर तिचे पती पेट्रोल आणण्यासाठी मोटारसायकल ढकलत पुढे गेले.
याच वेळी अचानक एक तरुण तेथे आला. त्याने महिलेचा हात धरत तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसण्यास सांगितले व “तुला दोन हजार रुपये देतो” असे लज्जास्पद आमिष दाखवले. या अनपेक्षित आणि अश्लील वर्तनामुळे महिला प्रचंड घाबरली व थरथर कापू लागली.


दरम्यान, तिचे पती घटनास्थळी परत येताना दिसताच संबंधित तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पती व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या तत्परतेमुळे त्याला पकडण्यात यश आले. चौकशीत त्याने आपले नाव वैभव आरणे, रा. कोकमठाण, ता. कोपरगाव असे सांगितल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर महिला मानसिक धक्क्यात असल्याने काही काळाने रात्री पतीसमवेत तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाणे येथे FIR क्र. 0156/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 75(1) व 75(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button