Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

साई संस्थांनने श्री साईनाथ रुग्णालयात मिळणारा 50 रुपये चा नवीन केस पेपर परत पूर्वीप्रमाणे दहा रुपये करावा

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात पूर्वी दहा रुपयाला नवीन केस पेपर काढता येत होता. आता तो संस्थानने  पन्नास रुपये केला आहे. नवीन रुग्णांना केस पेपर काढतांना आता पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत व त्याच महिन्यात परत तपासणीसाठी आल्यानंतर 25 रुपये देऊन केस पेपर मिळणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र या संस्थांनच्या निर्णयामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.    या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी हे साईबाबामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झाले आहे व येथे साई संस्थान कार्यरत आहे. शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना त्यांनी विविध रुग्णांची स्वतः सेवा केली. त्याचप्रमाणे साईउदी देऊन साईंनी अनेक भक्तांना  बरे केले. याच साईबाबांच्या रुग्णसेवेचा आदर्श घेऊन साई संस्थांनने शिर्डी येथे रुग्णालय सुरू केले आहेत.

श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय हे येथे सध्या सुरू आहेत. श्री साईनाथ रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. मात्र येथे पूर्वी केस पेपर काढण्यासाठी दहा रुपये लागत होते. मात्र एक मे पासून येथे दहा ऐवजी पन्नास रुपये नवीन केस पेपर काढण्यासाठी फी आकारण्यात आली आहे. तसेच रुग्ण एक महिन्याच्या आत परत तपासणीसाठी आल्यास त्यास पंचवीस रुपये देऊन फेर तपासणीचा केस पेपर मिळणार आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

साईबाबा संस्थान हे साईभक्तांनी साईबाबांना दान केलेल्या देणगीतून चालते. येथे साईबाबांवर श्रद्धा ठेवून अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. श्री साईनाथ रुग्णालयात आणि गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार होत होते व दहा रुपये देऊन केस पेपर मिळत होता. आता तो पन्नास रुपये झाला आहे.

मात्र अनेक रुग्णांकडे आता पन्नास रुपये नसल्यामुळे त्यांना संस्थांनच्या या रुग्णालयाकडून उपचार करून घेणे अवघड झाले आहे. साई संस्थान देशात एक श्रीमंत संस्थान समजले जाते. येथे देणगीचा ओघही मोठा आहे. अनेक दानशूर साईभक्त हे रुग्णालयासाठी दान देत असतात. आतापर्यंत विविध वैद्यकीय उपकरणेही साईभक्तांनी देणगी स्वरूपी दिलेली आहेत.

असे सर्व काही असताना श्री साईनाथ रुग्णालयात दहा रुपयाला नविन केसपेपर पन्नास रुपये  करणे योग्य आहे का? असा सवाल रुग्ण व साईभक्त, ग्रामस्थ करत आहेत . या निर्णयाचा फेरविचार संस्थांनने करावा  व परत पूर्वीसारखा श्री साईनाथ रुग्णालयाचा केस पेपर दहा रुपये करावा अशी मागणी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

तसेच जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत केस पेपर काउंटर वर सुट्टे पैशे ठेवावे त्या काउंटर वर कायम रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक गेल्यास सुट्टे नाही सुट्टे घेऊन या असे सांगितले जाते एकतर तासंतास नंबर लावून पुन्हा सुट्टे करण्यासाठी बाहेर जावे लागते आणि पुन्हा नंबर लावावा लागतो

त्यानंतर फेर केस पेपर काढण्यासाठी गेल्यास पाच रुपये सुट्टे आहेत का ही विचारणा होते आणि पुन्हा पाच रुपये सुट्टे आणण्यासाठी सांगितले जाते वेळ प्रसंगी पाच रुपये काउंटर वरून परत दिले जातं नाहीत ही एका प्रकारची फसवणूक त्याठिकाणी होत असतें म्हणून त्या काउंटर वर सुट्टे पैशे ठेवावेत आणि त्याठिकाणी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी होऊ लागली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button