Letest News
शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा...
राजकीयशिर्डी

शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

शिर्डी | प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी नगरपरिषदेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांचा समाजजीवनावर मोठा प्रभाव राहिला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. ग्रामविकास आणि सर्वांगीण समाजविकासासाठी त्यांच्या विचारांची नव्या पिढीला सातत्याने ओळख करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या समस्या, त्यांच्या आकांक्षा आणि विकासाच्या गरजा यांचा सखोल विचार केला. आशा, पुरुषार्थ आणि विकासाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्याशिवाय राष्ट्राची खरी प्रगती शक्य नाही, हा त्यांच्या विचारांचा गाभा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रसेवा, समाजचिंतन आणि अंत्योदयाच्या विचारांना अभिवादन करत उपस्थितांनी हे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button