
शिर्डी प्रतिनिधी/
शेअर बाजारात कायम गुंतवणुकीचा छंद जास्त नफ्याचा मोह शिर्डीतील एका कुटुंबाला लाखोचा चटका देणारा ठरला आहे वेळोवेळी पोलीस प्रशासन व सायबर सुरक्षा आव्हान करत असताना देखील केलेले दुर्लक्ष याचा फायदा काही भामटे घेत आहे मोबाईल वर आलेल्या जी एफ एस एल या नावाच्या अशोक नगर चेन्नई येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत बनावट खात्याचा विश्वास दाखवून वेळोवेळी लिंक आली मेसेज आले केलेल्या गुंतवणूक वर २० टक्के नफा होईल असे आश्वासन दिले त्यामुळे वेळोवेळी ४ लाख ९५ हजाराचा भरणा केला आमच्या खात्यात नफा देखील २० लाखाचा दिसत होता पण पैसे निघत नसल्याने शिर्डी येथील राष्ट्रीयक्रृत बॅन्केत जेथे माझे खाते आहे तेथे चौकशी केली असता ज्या ठिकाणी पैसे पाठवले आहे त्या बॅन्केत जी लिंक आली आहे त्याचे खाते नाही तुमचे तीन लाख रुपये होल्डवर ठेवल्याचे सागितले आमची फसवणूक झाली आहे त्यामुळे संदर नावाच्या आलेल्या लिक विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पल्लवी विजया ग्वालाणी राहणार वाघ वस्ती शिर्डी यांच्या फिर्यादी वरुन भादवी ४२७,४२०,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे