Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
क्राईमशिर्डी

अवैध धंदा करणाऱ्या दोन गटात राडा! कारची तोडफोड! कार मध्ये चॉपर सारखे सापडले शस्त्र!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील सावळीविहीर बुद्रुक येथील भवानीनगर भागामध्ये शुक्रवारी अवैध धंदा करणाऱ्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाला असून एका कारची तोडफोड करण्यात आली आहे. या कारमध्ये चॉपर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत असणारे सावळी विहीर बुद्रुक येथे शुक्रवारी अवैध धंदा करणाऱ्या दोन गटांमध्ये आपापसात चर्चा सुरू असताना त्या चर्चेचे रूपांतर शिवीगाळ व नंतर एकमेकाला मारहाण करण्यात झाले. त्यानंतर‌ येथिल एका ईरटीका कारची तोडफोड करण्यात आली.

ही घटना दिवसाढवळ्या झाल्याने व गावकऱ्यांना समजताच गावकरी घटनास्थळी धावले. त्यामुळे दोन्ही गटातील तरुण चार चाकी घटनास्थळी सोडून पळून गेले. दरम्यान या घटनेची शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच शिर्डी पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. शिर्डी पोलिसांनी तोडफोड झालेले ईरटीका कार हे वाहन ताब्यात घेतले असून या हाणामाऱ्या व तोडफोड प्रकरणी नेमकी कोण आहेत?

याचा तपास सुरू आहे. सध्या शिर्डी शहरात मोठी धरपकड सुरू आहे. शिर्डीत गंभीर घटना घडल्यानंतर व वरिष्ठांनी त्याची दखल घेतल्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाही शिर्डी जवळच आता अवैध धंदे करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. कोणताही धाक या अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहिला नाही. दिवसाढवळ्या हाणामाऱ्या होत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या वाढल्या आहेत.

अवैध धंदे करणाऱ्यांना कोण पाठबळ देते, अवैध धंदे करणारे एकमेकांचे वर्चस्व दाखवण्यासाठी हाणामाऱ्या करतात की परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी मारामाऱ्या करतात. याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. सावळीविहीर येथील घटनेतील तरुण हे गुन्हेगार प्रवृत्तीचे व विविध गुन्ह्यातील आरोपी असल्याचे बोलले जात आहे.या घडलेल्या सर्व प्रकरणाचा शिर्डी पोलीस तपास करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button