Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
Blog

साकुरीच्या माजी उपसरपंच सचिन बनसोडे यांच्या पत्यांच्या क्लबवर पोलिसांची धाड

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

दिनांक १८/०२/२०२५ रोजी पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे सचिन बनसोडे, रा.साकुरी, ता. राहाता हा अॅक्टीव स्पोर्टस क्लब, साकुरी येथे नोंदणी केलेल्या क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने मिळालेली माहिती पोनि/नितीन चव्हाण, राहाता पोलीस स्टेशन यांना कळवून पथक, पोनि/नितीन चव्हाण व राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अशांचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले.

DN SPORTS

kamlakar

पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या बातमीतील कातनाला, साकुरी, ता. राहाता येथील अॅक्टीव्ह स्पोर्टस क्लब येथे छापा टाकला असता येथील एका रूममध्ये दोन ठिकाणी काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. छाप्या दरम्यान दोन इसम पळून गेले. उर्वरीत इसमांना त्याचठिकाणी थांबण्यास सांगुन त्यांना पत्यांचा डाव कोण खेळवित आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सचिन योसेफ बनसोडे हा पत्त्याचे क्लबचा मालक असल्याचे सांगीतले.

 सदर ठिकाणी जुगार खेळणारे इसमांकडे विचारपुस करता त्यांनी सदर क्लबमध्ये रमी पत्त्यांचे नावाखाली पत्त्यांवरपैसे लावून तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळत असल्याने सांगीतले. पथकाने सदर ठिकाणी दोन डावामध्ये खेळत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारलो असता त्यांनी त्यांचे नाव १) गणेश विठठल जेजुरकर, वय ३५, रा. राहाता, ता. राहाता २) कैलास अशोक मंजुळ, वय २९, रा. कोपरगाव, ता. कोपरगाव

३) इक्बाल सैफु शेख, वय ३५, रा. शिडीं, ता. राहाता ४) अक्षय आप्पासाहेब खोतकर, वय २६, रा. खंडोबा गल्ली, राहाता ५) सचिन मधुकर बारे, वय ३५, रा. विजयनगर, सिन्नर, जि. नाशिक ६) ज्ञानदेव नामदेव गव्हाणे, वय ४२, रा. आडगाव, ता. राहाता ७) विजय अगस्तीन वाघमारे, वय ५०, रा. पिंपळस, ता. राहाता

 ८) भाऊसाहेब रामराव चौधरी, वय ३५, रा.रूई, ता. राहाता ९) संदीप सुधाकर अभंग, वय २८, रा. पळाशी, ता.नांदगाव, जि. नाशिक १०) सचिन योसेफ बनसोडे, वय २६, ता. साकुरी, ता. राहाता ११) महेश हरी लोखंडे, वय २३, रा. पिंपळस, ता. राहाता १२) अनिस नसीर शेख, वय ५०, रा. कोल्हार, ता. राहाता १३) वसंत लक्ष्मण वडे, वय ६४, रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक १४) समीर रफिक पटेल, वय २२, रा. कोल्हार, ता. राहाता

१५) मनोज लक्ष्मण मोरे, वय ४८, रा.साकुरी, ता. राहाता १६) सोमनाथ लक्ष्मण भगत, वय ४४, रा.घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक १७) उत्तम रामराव कोळगे, वय ५८, रा.नांदुर्खी, ता. राहाता १८) हमराज सर्फराज कादरी, वय ५५, रा.शिर्डी, ता. राहाता असे असल्याचे सांगीतले.

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण १४,१६,८४०/- रू किं. त्यात रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल, कार, डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपीविरूध्द राहाता पोलीस स्टेशन गुरनं ७२/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ), ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कारवाई राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.

वरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, रोहित वेमुल, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे  यांनी केलेली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button