Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
अ.नगरशिर्डी

साईबाबांच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्‍सव साजरा करण्‍यात आला.
आज पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्‍यानंतर सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान होवुन शिर्डी माझे पंढरपुर ही आरती झाली. त्‍यानंतर ०६.२५ श्रींच्‍या दर्शनास प्रारंभ झाला. दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०८.३० यावेळेत समाधी मंदिरातील स्‍टेजवर मंदिर कर्मचारी किशोर सासवडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तर रात्रौ ०९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक संपन्‍न होईल.

पालखी समाधी मंदिरात परत आल्‍यानंतर श्रींची शेजारती होईल. तसेच रात्रौ १२.२७ ते रात्रौ ०१.१६ यावेळेत श्रींच्‍या गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होईल.


महाशिवरात्री निमित्‍त संस्‍थानच्‍या श्री साईप्रसादालयात अंदाजे सुमारे ३५ हजार साईभक्‍तांनी मोफत प्रसादरुपी शाबुदाणा खिचडीचा लाभ घेतला. याकरीता सुमारे ४५ पोते शाबुदाणा, ३७०० किलो शेंगदाणे, ६६१ किलो तुप व २२५४ किलो बटाटा वापरण्‍यात आले. तर सुमारे १४ हजार ५५७ नाष्‍टा पाकीटांचा साईभक्‍तांनी लाभ घेतला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button