Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
Blog

जर तुमचेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात गट असतील तर निवडणूक कशाला?–सौ.प्रभावती घोगरे

शिर्डी ( प्रतिनिधी) नुकत्याच तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये
दोन्ही गट तुमचेच, मग निवडणुका कशाला ?असा प्रश्न कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांनी विखे पाटील यांचे नाव न घेता केला.
राहाता तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोनही गट तुमचेच होते तर निवडणुका कशाला घेतल्या. त्यामुळे प्रशासनावर अनावश्यक ताण, कार्यकत्यामध्ये हेवेदावे , शाब्दिक चकमकी,आर्थिक नुकसान झाले. कारखाने, बँका, मार्केट कमिटया, प्रवरा मुळा,निवडणुकासारख्या हया निवडणुका समन्वयातुन बिनविरोध का झाल्या नाही,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असा सवाल कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केला आहे. राहाता तालुक्यातीलनुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक
निकालाबाबत त्या म्हणाल्या की, तालुक्यातील संस्थेच्या निवडणुका कशासाठी? सर्व ग्रामपंचायत निवडणुका लावल्या जातात. यामुळे गावातील पालकमंत्र्यांच्या दोन गटात पार पडल्या. निवडणुकीत आपला मोठेपणा दाखवण्यासाठी या निवडणुका पार पडल्या. जर राजकीय विरोधकच दाखविण्यासाठी कार्यकर्त्याकडु नाही तर पालकमंत्र्याकडुन आपल्या संसार प्रपंचाची होळी आपल्याच कार्यकर्त्याना एकमेकांच्या विरोधात उभेकरून होते.

वारेमाप पैसा उधळला जातो.अनेक तरुण याकाळात व्यसनाधिन होतात. पाटर्या होतात. त्यामुळे अनेक पशुचा बळी जातो. प्रशासकीय कामे सोडुन शासकीय
यंत्रणा कामाला लागते. पालकमंत्र्यांच्या कारखाने, बँका, मार्केट कमिटी, मुळा प्रवरा या सारख्या संस्थाच्या निवडणुका
बिनविरोध केल्या जातात. मग जर प्रत्येक गावात सर्व आपलेच कार्यकर्ते आहेत तर निवडणूक का होत नाही,
निवडणुकामुळे कार्यकर्त्याच्या घराघरात वाद होतात, निवडणूक वरून एकमेकात दुश्मनी तयार होते. नंतर सुख, दुख:
, लग्नकार्य, अंत्यसंस्कार सारख्या बाबी मध्ये एकमेंकाना मदत न करणे पर्यंत हे राजकारण जाते.

kamlakar

जो गट निवडुन येतो तो हारतुरे घेतो, मात्र निवडणुकीत जो पराभूत होतो. त्याला विजयी झालेला गट किरकोळ समजतो. त्यामुळे आपापसात निवडणुकीवरून दुश्मनी तयार होते. तेव्हा युवकांनी सुध्दा समाजात जनजागृती केली पाहीजे. गावातल्या निवडणुका जर अशा
एकाच नेत्याच्या दोन गटात होणार असेल तर आपण यापासून अलिप्त राहायला हवे. संघर्ष, पार्टी, व्यसन, वायफळ खर्च टाळला पाहिजे व कुटुंबाची हानी टाळली पाहीजे. पालकमंत्र्यानी स्वतः च्या संस्थेच्या निवडणुका प्रमाणेच पुढील टप्प्यातील निवडणुका आपल्याच दोन गटात घेण्याऐवजी त्या समन्वयातुन बिनविरोध कराव्यात.असे मत कृषीभुषण प्रभाताई
घोगरे यांनी व्यक्त केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button