Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरक्राईम

श्री रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या पैशाचा व देणगी मालमत्तेचा अपहार! 11 आरोपींवर गुन्हा दाखल! दानपेट्यांनाही सील!

कोपरगाव (प्रतिनिधी )कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिराच्या ट्रस्टच्या पैशाचा ,सोन्या-चांदीच्या वस्तू व इतर मालमत्तेचा अपहार करून धर्मादाय उप आयुक्त कार्यालयातील परिशिष्ट 1 चे बनावटीकरण दस्तऐवज केल्याप्रकरणी आणि या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिव व विश्वस्त हे ज्ञात होत नसल्याने त्याचप्रमाणे सदर मंदिराचे बांधकाम परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू असून कोपरगाव ते वैजापूर या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हे अतिक्रमण काढून घ्यावे असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव , कार्यकारी अभियंता संगमनेर कार्यालयाने मंदिर ट्रस्टला नोटीसही दिली आहे. त्यामुळे या मंदिर बांधकामासाठी मदत निधी व त्यासाठी देणगी पावत्या फाडणे बेकायदेशीर आहे. मंदिरातील दानपेट्या धर्मादाय उप – आयुक्त कार्यालयाकडून सील करण्यात आल्या असून चैत्र पौर्णिमेनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

त्यामुळे भाविकांनीही सोन्या – चांदीच्या वस्तू येथे रोख न देता, पावती न फाडता दानपेटीतच दान टाकावे. जेणेकरून भाविकांची फसवणूक होणार नाही. असे ॲड. वैभव रमेश शिंदे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात वैभव शिंदे यांनी म्हटले आहे की,उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या संदर्भात मा. मुख्य धर्मादाय आयुक्त सो. महाराष्ट्र राज्य, मुंबई.,मा. सह धर्मादाय आयुक्त सो. पुणे विभाग, पुणे, व मा. धर्मादाय उप-आयुक्त सो. सार्वजनिक न्यास नोंदणी, कार्यालय,

अहमदनगर (अहिल्यानगर) विभाग, अहिल्यानगर, यांना उक्कडगांव, ता. कोपरगांवच्या श्री रेणुका माता मंदिराच्या अनुषंगाने मंदीराचे ट्रस्टच्या पैशांचा, सोन्या-चांदीच्या वस्तु, व इतर मालमत्तेचा अपहार करुन, धर्मादाय,उप-आयुक्त कार्यालयात परिशिष्ट १ चे बनावटीकरण केलेल्या दस्ताच्या बाबत कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनला दिनांक २९/०६/२०२४ रोजी गुन्हा रजि. क्र. ०२४१/२०२४ गुन्हा दाखल झाला आहे.

त्याच्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चैत्र पौर्णिमेच्या अनुषंगाने दानपेट्यासील करुन प्रशासक नेमणेबाबत ॲड. वैभव रमेश शिंदे व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला होता. या अर्जात म्हटले होते की,
वरील श्री रेणुका माता मंदिराच्या मालमत्तेच्या अपहाराच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी १) निवृत्ती रंगनाथ शिंदे, २) अशोक गंगाराम शिंदे, ३) लुखाजी सावळेराम शिंदे, ४) सोपान कारभारी शिंदे,

५) बाळासाहेब शंकर शिंदे, ६) नंदू अशोक शिंदे, ७) देविदास लुखाजी शिंदे, ८) बाळासाहेब कारभारी शिंदे, ९) प्रकाश लक्ष्मण शिंदे, १०) विजय बबन शिंदे, ११) शिवाजी आण्णासाहेब लावरे यांचे विरुध्द कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनला दिनांक २९/०६/२०२४ रोजी श्री. रेणुका देवी मंदीरच्या ट्रस्टच्या पैशांचा, सोन्या-चांदीच्या वस्तु, व इतर मालमत्तेचा अपहार करुन, धर्मादाय उप-आयुक्त कार्यालयाच्या परिशिष्ट १ चे बनावटीकरण केल्याचे तक्रारीवरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ०२४१/२०२४ भा.दं.वि कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे दाखल झालेला आहे.


सदरचा गुन्हा हा सध्या तपासावर असुन सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सदर गुन्हयातील आरोपी यांचा जामीन अर्ज कोपरगांव येथिल मा. अति. सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच सदर मंदीराबाबत मदत निधी उभारण्यासाठी आपल्या कार्यालयाची कुठलीही परवानगी नाही. सदर न्यासाचे कायदेशिर विश्वस्त कोण आहेत, याचा बोध आपल्या कार्यालयाला देखिल होत नाही व सदर न्यासास अध्यक्ष, सचिव आदी कोणतेही पदाधिकारी दिसुन येत नाही.

असा आपल्या कार्यालयाचा निरीक्षक चौकशी अहवाल आहे. यातील काही आरोपींवर यापुर्वी श्री. रेणुका देवी मंदीराची दानपेटीतील रक्कम चोरुन नेल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. अशी सध्यपरिस्थिती असुन श्री. रेणुका देवी मंदीराचा चैत्र पौर्णिमा उत्सव दिनांक ११/०४/२०२५ पासुन सुरु होणार आहे.श्री. रेणुका देवी मंदीरात दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व मोठ्या प्रमाणात येणारे भाविक हे मंदीरासाठी दान करतात व तो निधी हा श्री. रेणुका देवी मंदीरात येत असतो. वर नमूद १ ते ११ इसम हे आरोपी आहे.

गुन्हयाचे ठिकाण हे श्री. रेणुका देवी मंदीर, त्यातील दानपेटीतील पैशांचा, सोन्या-चांदीच्या वस्तूंचा अपहार, व पर्यायाने भाविकांच्या पैशांचा अपहार करून त्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर गुन्हयाची पार्श्वभुमी पाहता नमुद दाखल गुन्हयातील आरोपी यांना सदर ट्रस्टचे कामकाजापासुन अलिप्त ठेवणे योग्य व क्रमप्राप्त आहे. सदर आरोपी यांना सदर मंदीर ट्रस्टचे कामकाजापासुन अलिप्त न ठेवल्यास सदर मंदीर ट्रस्टला येणारे दान याचा पुन्हा अपहार होण्याची शक्यता आहे

तसेच परीणामी मंदीराचे नुकसान होण्याची तसेच त्याच कारणावरुन पुन्हा परीस्थीती बिघडण्याची शक्यतां नाकारता येत नाही.या करिता सदर श्री. रेणुका देवी मंदीरात चैत्र पौर्णिमा सुरु होण्याच्या अगोदर सदर मंदीराची देखरेख व कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमून श्री. रेणुका देवी मंदीराच्या दानपेट्या सील करुन श्री. रेणुका देवी मंदीरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चालू राहणेकामी उचित कार्यवाही तातडीने करण्यात यावी व सदर प्रकरणी योग्य निर्णय तत्परतेने घ्यावा अशी विनंती‌ धर्मादाय उप आयुक्त अहमदनगर यांना करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने सदर रेणुका माता मंदिरातील दाण पेट्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आणी धर्मादाय उप आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी गावातील पंचांच्या साक्षीने शासन प्रक्रियेने तातडीने सील केले आहे. त्यामुळे चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांनी देणगी दान पेटीमध्येच टाकावे. रोख स्वरूपात किंवा पावती किंवा मदत निधी हा संबंधित गुन्हा दाखल झालेल्या आरोपींकडे देणे अनधिकृत राहील,

संबंधित आरोपींना असा मदत निधी गोळा करण्याचा अधिकार नसून ते बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे येथील मंदिराचे बांधकाम परवानगी न घेता सुरू आहे तसेच ते कोपरगाव वैजापूर या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून होत आहे. त्यामुळे या मंदिरासाठी देणगी पावत्या किंवा मदत निधी गोळा करणे बेकायदेशीर आहे. हे रस्त्यावर येणारे मंदिराचे अतिक्रमण काढून टाकावे म्हणून कोपरगाव तसेच संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागानेही या मंदिर ट्रस्टला नोटीसा दिल्या आहेत.

त्यामुळे या वरील आरोपींकडे मंदिरासंदर्भातला कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. देणगी दानपेट्यातच टाकावी असे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ॲड वैभव रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button