श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांना मिळणार सात लाख रुपये मेंबर कर्ज!
शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत संस्थेचे संचालक श्री विठ्ठल पवार यांनी सात लाख रुपये कर्ज सभासदांना देण्यात यावे. अशी मागणी केली होती .त्यास मंजुरी मिळून 7 डिसेंबर 2023 पासून मेंबर कर्ज सात लाख रुपये मर्यादेपर्यंत तसेच मेंबर क्लीन कॅश क्रेडिट कर्ज सात लाख रुपये मर्यादेपर्यंतचे वितरण सुरू होत आहे .त्यामुळे सभासदांमधून समाधान व्यक्त होत असून संस्थेच्या सर्व सभासद बंधू भगिनींनी याची नोंद घ्यावी. अशी माहिती या संस्थेचे विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी दिली आहे.

संस्थेचे विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत आपण सभासदांचे हित लक्षात घेऊन ही मागणी केली होती. तिला मंजुरी मिळून या संस्थेद्वारे नुकतेच पाच डिसेंबर 2023 रोजी परिपत्रक काढण्यात आले असून या परिपत्रकात संस्थेमार्फत संस्थेच्या सभासदांना वितरित करण्यात येत असलेले मेंबर कर्ज व मेंबर क्लीन कॅश क्रेडिट कर्ज मर्यादित प्रत्येकी दोन लाख रुपये वाढ करून दिनांक ७ डिसेंबर 2023 पासून मेंबर कर्ज सात लाख रुपये मर्यादेपर्यंत तसेच मेंबर क्लीन कॅश क्रेडिट कर्ज सात लाख रुपये मर्यादेपर्यंतचे वितरण सुरू होत आहे. असे या परिपत्रका द्वारे कळविण्यात आले आहे.
त्यामुळे सभासद बंधू-भगिनींना याचा मोठा लाभ होणार आहे. आपल्या मागणीला सभासदांच्या पाठिंबामुळे व आशीर्वादामुळे यश मिळाले असून सभासदांनी यापुढे त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री विठ्ठल पवार यांनी म्हटले आहे. या निर्णयाचे संस्थेच्या सर्व सभासदांमधून स्वागत होत असून संचालक विठ्ठल पवार यांचेही सभासदांनी धन्यवाद मानले आहेत.