Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
शिर्डी

साईबाबा संस्थानाच्या भोजनालयात आज साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

साई बाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या वारकऱ्यांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केलीय. शिर्डी माझं पंढरपूर ही आरती साई बाबा मंदिरात नित्य निमयमानं म्हटली जाते. त्याचीच प्रचिती आज झालेल्या भाविकांच्या गर्दीनं दिसून येत आहे. साई बाबा संस्थाननंही एकादशीचं महत्व लक्षात घेत, शिर्डीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 7 हजार किलो शाबुदाना खिचडी आणि शेंगदान्याचा झिरकं प्रसाद स्वरुपात बनवण्यात आला.शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर शाबुदान्याची खिचडी आणि झिरकं हेच प्रसाद म्हणून देण्यात येतो. एरवी साई बाबांच्या प्रसादलयात चपाती, दोन भाज्या, वरण भात, स्वीट, असा प्रसाद भाविकांना देण्यात येतो. मात्र महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला खास करून भाविकांना उपवास असतो. त्यामुळे साई बाबा संस्थानच्या वतीनं शाबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं दिल्या जाते.आज रात्री विठ्ठल रुखमिणीची प्रतिमा ठेऊन साईंच्या रथाची मिरवणूक शिर्डीतून काढण्यात येते. आषाढी एकादशी निमित्तानं कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त एस. प्रकाश यांच्‍या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली. प्रसन्न मनानं भाविक मंदिरात आल्यानंतर फुलांची सजावट मन मोहुन टाकत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button