Letest News
कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण
क्राईमशिर्डी

प्रेम-पैसे आणि ‘खंडणी’चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील ट्रॅव्हल्स व्यावसायिक योगेश तिया यांनी दाखल केलेल्या कथित खंडणीच्या गुन्ह्यामुळे आता केवळ एका एफआयआरची चौकट ओलांडून अनेक कायदेशीर, सामाजिक आणि नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फिर्यादीतील उल्लेख, दीर्घकाळ संबंध असल्याचा दावा, लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा संदर्भ, पत्नीने कथितरित्या मध्यस्थी केल्याचा उल्लेख आणि मुंबईत दाखल झालेला झिरो एफआयआर शिर्डी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ आणि घटनाक्रम. फिर्यादीनुसार संबंधित महिला आणि योगेश तिया यांच्यात तीन ते चार वर्षांपासून ओळख व संबंध असल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. जर तसे असेल, तर एवढ्या प्रदीर्घ काळात वाद निर्माण झाला नव्हता का? आणि नेमक्या कोणत्या टप्प्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली? या प्रश्नांची उत्तरे आता केवळ पोलिस तपासातूनच स्पष्ट होऊ शकतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेचा ठरत आहे. फिर्यादीतील कथनानुसार, संबंधित महिलेने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर योगेश तिया यांच्या पत्नीने कथितरित्या मध्यस्थी करत दोन ते तीन लाख रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव दिल्याचा उल्लेख आहे. हा दावा खरा की खोटा, याची पडताळणी तपास यंत्रणाच करणार आहे. मात्र या उल्लेखामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
याशिवाय, फिर्यादीत लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोणतीही व्यक्ती कोणाला दहा-बारा लाख रुपये हातउसने का देईल? त्या व्यवहारांचे स्वरूप नेमके काय होते? त्यासंदर्भातील बँक व्यवहार, आर्थिक पुरावे किंवा इतर कागदपत्रे उपलब्ध आहेत का? या सर्व बाबींची शहानिशा तपासादरम्यान होणे अपेक्षित आहे.


या प्रकरणाचा आणखी एक सामाजिक पैलू चर्चेत आहे. योगेश तिया विवाहित असून त्याला कुटुंब आहे, असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंध का निर्माण झाला? दुसरीकडे संबंधित महिलेची भूमिका काय होती? दोन्ही बाजूंचे दावे कितपत सत्य आहेत? या सर्व बाबींचा निर्णय केवळ चर्चांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारेच होणार आहे.
आता शिर्डी पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, संबंधित व्यक्तींचे जबाब, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि फिर्यादीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल पडताळणी तपासाचा भाग असू शकते. तपासात जे निष्पन्न होईल, त्यावरच पुढील कायदेशीर दिशा आणि न्यायालयीन प्रक्रिया अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिर्डी परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास पूर्ण होणे आवश्यक आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात मैत्री ते कथित प्रेम आणि आर्थिक व्यवहारांचा प्रवास उलगडण्यात आला. दुसऱ्या भागात मुंबईत दाखल झालेल्या झिरो एफआयआरमुळे निर्माण झालेले कायदेशीर प्रश्न मांडण्यात आले. आता तिसऱ्या भागानंतर सर्वांचे लक्ष पोलिस तपास आणि त्यातून समोर येणाऱ्या सत्याकडे लागले आहे.
या प्रकरणात नेमके सत्य कोणाच्या बाजूने उभे राहणार तर पुरावे, पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच होणार आहे.

या प्रकरणात चर्चेत असलेले महत्त्वाचे प्रश्न
तीन ते चार वर्षे संबंध असल्याचा दावा असेल, तर खंडणीची तक्रार नेमकी आता का दाखल झाली?
दहा ते बारा लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा असेल, तर त्याचे बँक व्यवहार, पुरावे किंवा लेखी नोंदी आहेत का?
फिर्यादीतील कथित उल्लेखानुसार पत्नीने मध्यस्थी केली असेल, तर त्यामागचे नेमके कारण काय होते?
दोन ते तीन लाख रुपये घेऊन प्रकरण मिटविण्याची कथित चर्चा झाली असेल, तर त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध आहेत का?
विवाहित असूनही विवाहबाह्य संबंध निर्माण झाल्याचा आरोप का आणि कसा निर्माण झाला?
संबंध परस्पर संमतीने होते की कोणत्याही प्रकारचा दबाव होता? याबाबत तपासातून काय निष्पन्न होते?
महिलेने कथित धमक्या दिल्याचा दावा कितपत सत्य आहे? त्यासंदर्भातील कॉल रेकॉर्ड, चॅट किंवा ऑडिओ पुरावे आहेत का?
मुंबईत झिरो एफआयआर दाखल करून प्रकरण शिर्डीकडे वर्ग करण्यामागील कारण काय होते?
दोन्ही बाजूंच्या मोबाईल कॉल डिटेल्स, चॅट, आर्थिक व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नेमके काय सांगतात?
या प्रकरणात कोणाची फसवणूक झाली, की कोणावर खोटे आरोप झाले? याचे उत्तर तपासातून मिळणार का?
फिर्यादीतील प्रत्येक दाव्याची पोलिसांकडून स्वतंत्र पडताळणी केली जाणार का?
अखेर या गाजत असलेल्या प्रकरणात सत्य कोणाच्या बाजूने आहे, हे पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार का?

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button