Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
अ.नगरशिर्डी

दोन लाख रुपयांचं सोन्याचं घड्याळ संस्थानच्या सुरक्षारक्षकांना सापडलं

शिर्डी साईबाबांच्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ दोन लाख रुपयांचं सोन्याचं घड्याळ संस्थानच्या सुरक्षारक्षकांना सापडलंय. घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा आणि Victoria Empress असे लिहिलेले असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे हे घड्याळ जमा केलंय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

घड्याळ कोणाच्या हातून पडलं का? कोणीतरी श्रद्धेने साईबाबांना अर्पण केलंय? हे मात्र अद्याप समजू शकले नसले तरी संस्थानच्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतंय.

पिवळ्या रंगाचे एक घड्याळ आढळले : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. साईंच्या समाधीच्या दर्शनानंतर बाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केलेल्या द्वारकामाईतही भाविक दर्शनासाठी जातात.

साईबाबा जिथे आपल्या हयातीत बसायचे त्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील महिला सुरक्षारक्षक रंजना कुंभार आणि रशीद शेख हे दोन कर्मचारी ड्युटीवर कार्यरत असताना पिवळ्या रंगाचे एक घड्याळ आढळून आल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांनी ते घडाळ्य सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे जमा केलंय.

व्हिक्टोरिया इंप्रेस लिहिलेलं घड्याळ सोन्याचं : मात्र या घडाळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा आणि व्हिक्टोरिया इंप्रेस असं लिहिलेलं असल्याने ते घड्याळ सोन्याचं असल्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आणि सुरक्षा विभागातील सुदाम कोते यांनी त्या घड्याळाची सोनाराकडून तपासणी केली असता ते घड्याळ लेडीज असून,

चक्क 22 कॅरेट सोन्याचे आहे, ज्याची किंमत तब्बल दोन लाख असल्याचं समोर आलंय. हे घड्याळं खास बनवून घेतले गेलेले असल्याने त्याची किंमत दोन लाखांहून अधिक ही असू शकतो, असे सोनाराकडून सांगण्यात आलंय.

भाविकानेच घड्याळ द्वारकामाईत टाकल्याची शक्यताही : मौल्यवान घड्याळ पडल्यानंतरही संबंधित महिला भाविकाने घड्याळ हरविल्याची तक्रार साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलिसांकडे अद्यापही केलेली नसल्याने भाविकानेच हे घड्याळ द्वारकामाईत टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

साईबाबा संस्थानच्या वतीनं द्वारकामाईतील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले जात असून, भाविकाचा शोध घेतला जातोय. मात्र ज्या भाविकाचं घड्याळ असेल त्या भाविकाने आपली ओळख पटवून घड्याळ घेऊन जाण्याचे आवाहनही संस्थानच्या वतीने करण्यात आलंय.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button