Letest News
शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार
अ.नगरक्राईम

कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहर व तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी धडक छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकत ११ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २ लाख १४ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. पथकाने कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांची माहिती गोळा करून पंचांसमक्ष पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
कारवाईदरम्यान गुटखा विक्रीप्रकरणी तीन गुन्हे आणि जुगार अड्ड्यांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. गुटखा विक्रीप्रकरणी अभिजीत रविंद्र ठाकरे, नदीम सलीम शेख, अल्ताफ अलीम मनियार, अरिफ रज्जाक पठाण यांच्यासह इतरांवर गुन्हे नोंदविण्यात आले. जुगार अड्ड्यांवरील कारवाईत गणेश गर्जे, विनोद आहिरे, प्रसाद पेंढारे, सोमनाथ महाजन, रविंद्र तेलोरे यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.


या कारवाईत चंद्रकांत जाधव आणि अर्जुन सोनी हे दोन आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button