Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक

शिर्डी :
काही दिवसांपासून गाजत असलेल्या खरात प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत असून, या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात शिर्डी पोलिसांची गुप्त कारवाई निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरातच्या गैरप्रकारांबाबत महत्त्वाची माहिती नीरज जाधवकडे असल्याचे लक्षात येताच, त्याच्यावर दबाव आणण्यासाठी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या तक्रारीमागील हेतू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत गोपनीय तपास सुरू केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक सोमनाथ बाकचौरे, उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या टीमने अत्यंत गुप्तपणे तपासाची सूत्रे हातात घेतली. नीरज जाधवशी संपर्क साधून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीसह त्याच्या मित्रांमार्फत पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या पेनड्राईव्हमधील धक्कादायक पुराव्यांमुळे तपासाला नवे वळण मिळाले.
दरम्यान, ७ ते १४ मार्च दरम्यान पोलिसांनी दोन शिफ्टमध्ये साध्या वेशात खरातच्या बंगल्याबाहेर नजर ठेवली. त्याच्या हालचाली, भेटणारे लोक, येणारी-जाणारी वाहने यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर संशयास्पद हालचाली दिसताच त्याचा गुप्तपणे पाठलागही करण्यात आला.


तपासादरम्यान खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर १० मार्च रोजी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. यामुळे त्याचा पलायनाचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
विशेष म्हणजे, संपूर्ण कारवाईदरम्यान शिर्डी पोलिसांनी स्वतंत्रपणे ऑपरेशन राबवून तपास पुढे नेला, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. वेळेत ही मोहीम राबवली नसती, तर आरोपी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता अधिक होती.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शिर्डी पोलिसांनी जमा केलेले सर्व महत्त्वाचे पुरावे एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button