Letest News
कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य...
क्राईमशिर्डी

सावळीविहीर ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार — वारंवार चोरी नागरिक भयभीत! माजी सरपंच अशोकराव आगलावे

शिर्डी प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

सावळीविहीर बु. (ता. राहाता, जि. अहिल्यानगर):
सावळीविहीर ग्रामपंचायतीचा निष्काळजी व बेजबाबदार कारभार दिवसेंदिवस उघड होत आहे.
बाजारतळ परिसरात गेल्या काही महिन्यांत मोबाईल, पर्स, सोन्याचे गंठण, मंगळसूत्र अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, तरीसुद्धा पंचायत प्रशासन बेदरकारपणे हातावर हात ठेवून बसले आहे.


शेतकऱ्याचा आयफोन 14 चोरीला — पोलिसात तक्रार दाखल

DN SPORTS

शेतकरी अरविंद धिवर हे गुरुवारी  सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाजारतळ सावळीविहीर बु येथे भाजीपाला खरेदीसाठी गेले असता, त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून ₹40,000 किंमतीचा आयफोन 14 (पांढरा रंग) अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याबाबत त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्र. 0935/2025 अन्वये कलम 303(2), भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत फिर्याद दिली असून तपास सुरू आहे.


वारंवार चोरी — तरीही ग्रामपंचायतीकडून ‘शून्य’ उपाययोजना

नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.

“बाजारात मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने, मंगळसूत्र — सगळं काही चोरट्यांच्या हाती लागतंय!
पण ग्रामपंचायत मात्र पावत्या वसूल करण्यातच व्यस्त आहे.
सुरक्षा व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाही, आणि कोणतेही जबाबदार अधिकारी दिसत नाहीत!”
असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

kamlakar

गेल्या काही बाजारांमध्ये अशा चोरीच्या घटनांची मालिका सुरू असून, ग्रामपंचायतीने एकदाही चौकशी, पहारा व्यवस्था किंवा सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची तसदी घेतलेली नाही.


पंचायत झोपेत — नागरिक भयभीत!

दर आठवड्याला हजारो लोक बाजारात गर्दी करत असतात, परंतु पोलिसांचा बंदोबस्त नाही, ग्रामपंचायतीकडून कोणताही सुरक्षारक्षक नाही.
चोरट्यांना हवे तसं वातावरण तयार झालं आहे आणि सामान्य नागरिक भीतीने बाजारात जात आहेत.

“आम्ही दर आठवड्याला बाजारात जातो, पण मनात भीती असते — मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने सुरक्षित राहतील का?”
असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारत आहे.


 अशोकराव आगलावेंचा इशारा 

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर पंचायत प्रशासनाने पुढील बाजारापूर्वी सुरक्षेची ठोस व्यवस्था केली नाही, तर ग्रामपंचायतीसमोर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.


मुख्य मागण्या

  1. बाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत
  2. प्रत्येक बाजार दिवशी सुरक्षारक्षक नेमावेत
  3. बाजार शुल्कातून सुरक्षा निधी राखावा

वारंवार चोरीच्या घटनांचा तपास गतीमान करून दोषींना शिक्षा द्याव
“सुरक्षा नाही, जबाबदारी नाही — मग पावत्या कशा नागरिकांचा थेट सवाल —

“ग्रामपंचायतीने बाजारातून लाखो रुपये महसूल वसूल केला, पण सुरक्षा शून्य!
मग या पावत्या फक्त महसूल गोळा करण्यासाठी आहेत का, की नागरिकांच्या सेवेसाठी?”
सावळीविहीर ग्रामपंचायतीने आता जागं व्हावं — नाहीतर ग्रामस्थांचा रोष भडकणार आहे!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button