Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

दिनेश आहेर यांची एक खास बात आहे ! कारण थेट वरपर्यंत त्यांचे हात आहे !!

भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि.22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. खासदार लंके यांनी यासंदर्भात आज पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले असून, उपोषणासाठी लाऊडस्पीकर, तसेच मंडप लावण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे. निवेदनात नमूद करण्यात आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत 11 जुलै रोजी पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते. मात्र, त्याची अद्यापि कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण व आपले सहकारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.गुन्हे शाखेविरोधात खासदार लं…

sai nirman
जाहिरात

या तक्रारीसंदर्भात खासदार लंके यांनी 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्याकामी रवींद्र आबासाहेब कर्डिले मदत करीत आहेत. रवींद्र कर्डिले यांची शिर्डी येथे सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही आस्थापना वेगवेगळ्या असून, दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाखांचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापायी असल्याचा आरोप खासदार लंके यांनी पत्रात केला आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button