महंत रामागिरी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार मिटकरी यांचा शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला
मिटकारी यांनी जे हिंदूंचे श्रद्धा स्थान असणारे महंत रामगिरी महाराज यांच्या् विषयी जे गरळ ओकले आहे त्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी यांनी दैनिक साईदर्शनशी बोलतांना सांगितले
सुनील परदेशी यांनी पुढे सांगितले कि आपण महंत रामगिरी महाराज यांना सखल हिंदूचे आदर्श माणूनतो हिंदू संस्कृती मध्ये साधू संतांना सर्वाधिक महत्व देण्यात आलेले आहे मिटकरी यांच्या सारख्या बिनाडोक आमदाराने अश्या प्रकारे गरळ ओकल्याने आमच्या भावनाना ठेस पोहोचवली आहे म्हणून मी शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन ह्या माठेफिरू मिटकरी विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि ह्यापुढे आमच्या श्रद्धास्थान असलेल्या संता बद्दल कुठल्याही प्रकारचे बेताल वक्तव्य सहन केले जाणार नाही ह्यापुढे कोणी असे वक्तव्य केल्यास जश्यास तसें उत्तर दिले जाईल असे शिवसेना शिर्डी समन्वय सुनील परदेशी म्हणाले
जाहिरात
DN SPORTS