Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरक्राईम

शिर्डीसह सावळीविहीर निमगाव येथे राजरोसपणे अवैद्य व्यवसाय सुरूच  पोलिसांचे मात्र दुर्लक्ष 

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी मध्ये दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त व अवैध धंद्यांवर धाडी सत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीचे तसेच अवैध धंदे करणारे शिर्डीत दिसून येत नव्हते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र नव्याचे नऊ दिवस संपले आणि परत शिर्डीत जैसे थे परिस्थिती होऊ लागली आहे. शिर्डीत परत अवैध धंदे तेजीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाढवळ्या तरुण मुलींना टवाळखोर युवक छेडछाड करत आहेत.


  शिर्डी हे धार्मिक तीर्थस्थान आहे. येथे देश विदेशातून साईभक्त येत असतात. मात्र अनेकदा या साईभक्तांना पॉलिशवाले एजंट व काही टवाळखोरांकरांकडून आर्थिक लुटमार केली जाते. येथे पाकीटमारी , धूम स्टाईल चोऱ्या, त्याचप्रमाणे अवैध दारू गांजा विक्री, मटका जुगार क्लब, सर्रास सुरू आहेत. काही दिवस हे बंद होते .

परंतु आता परत हळूहळू हे अवैध धंदे सुरू झाले आहेत. अवैध प्रवासी वाहतुक  परत दिसून येत आहे.काही रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे. साईभक्तांच्या वाहनाला एका रिक्षा चालकाने स्वतःहून कट मारला व उलट साई भक्ताच्या वाहनचालकालाच शिवीगाळ करण्याचा प्रकार नुकताच येथे पिंपळवाडी रोडला घडला आहे.

शिर्डीत पानमळा येथे एका तरुणाने एका तरुण मुलीच्या गळ्यात हात घालून ओढत नेण्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार येथे सर्रास घडत आहेत. शिर्डीसह सावळीविहीर निमगाव येथे राजरोसपणे  पत्त्यांचे क्लब जुगार मटका चालू असल्याची यादीच प्रसिद्द झाली आहे तरीही शिर्डी पोलीस यांच्याकडे लक्ष डे नसल्याने काही चिरीमिरी घेऊन हे सर्व अवैद्य व्यवसाय सुरु आहेत कि काय असे नागरीकांमधी बोलले जात आहे

यावर नियंत्रण कधी येणार. येथे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही असा सवाल आता साईभक्त, ग्रामस्थ करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. व साई भक्तही आहेत. त्यांनीच शिर्डीतील या गुन्हेगारी प्रवृत्ती, व विशेष लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आदेश द्यावेत व शिर्डीत एक धार्मिक वातावर,ण स्वच्छ वातावरण व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याचा प्रयत्न होईल. असा प्रयत्न करावा अशी मागणी साईभक्त, ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button