Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
क्राईमशिर्डी

शिर्डीत पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे छापे!  नमुने घेतले तपासणीसाठी!  नमुने घेतले तपासणीसाठी! 

शिर्डी (प्रतिनिधी )
शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात पेढे विक्री होतात .व त्यातून मोठे पैसे कमवले जातात.
देश-विदेशातून येथे आलेले साईभक्त साई दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे घेतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र हे पेढे भेसळ असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले असून अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने शिर्डीमध्ये पेढे विक्री दुकानांमध्ये छापे टाकून पेढ्याचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. भेसळ पेढे आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने दिला आहे.


शिर्डीला श्री साई दर्शनासाठी मोठ्या संख्येने देश-विदेशातून साईभक्त येत असतात. येथे आल्यानंतर व साई दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे खरेदी केले जातात. मात्र येथे त्यामुळे पेढे विक्री दुकाने,रस्त्यालगत पेढ्याची दुकाने थाटली आहेत. मात्र या सर्व ठिकाणी शुद्ध पेढे मिळतातच असे नाही तर अनेक ठिकाणी भेसळयुक्त असे पेढे विक्री केले जाते.

या संदर्भात नुकतीच अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने शिर्डीमध्ये पेढे विक्री केंद्रांवर धाडी टाकत अनेक ठिकाणचे पेढे चे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचे बोलले जात असून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. दरम्यान शिर्डी मध्ये अनेक छोटे-मोठे दुकानदार पेढे विक्री करतात.

मात्र पेढे बनवण्याचे काम हे दुसरीकडे होते. होलसेल दराने हे दुकानदार पेढे घेतात व साई भक्तांना विक्री करतात. मात्र पेढे बनवणारे मोकळे राहतात व दुकानदार हे भेसळपेढे विक्री करताना पकडले जातात. त्यामुळे दुकानदारांबरोबरच भेसळ पेढे बनवणाऱ्यांचेही रॅकेट उघडे करणे महत्त्वाचे असून अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

शिर्डीच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पेढे विक्री केले जातात. मात्र त्याचा फायदा घेऊन अनेक पेढे बनवणारे ,पेढे विक्री करणारे भेसळ पेढे भक्तांच्या माथी मारतात. त्यामुळे या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी साईभक्त यांनी अन्न व औषध प्रशासन भेसळ प्रतिबंध विभागाकडे केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button