Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
क्राईमशिर्डी

खाकी वर्दीतील लुटारू! साईबाबांच्या दरबारात भक्तांच्या झोळीत हात घालणारा पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबेंचे पाप आणि कर्मफळ

साईबाबांच्या दरबारातच भक्तांच्या झोळीत हात – नवलनाथ तांबेंचे पाप आणि कर्मफळ**
शिर्डीतील तत्कालीन पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे हे नाव आजही खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या घटनांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
साईबाबांच्या पवित्र भूमीत, श्रद्धेने येणाऱ्या भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर होती, त्याच व्यक्तीने खाकी वर्दीच्या आड लुटीचा धंदा उघडपणे चालवला, ही बाब शिर्डीकर आजही विसरलेले नाहीत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राजकीय वरदहस्तामुळे मोकाट कारभार
नवलनाथ तांबे यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही जुमानत नव्हते.
त्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, तर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत जावळे यांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यरत होते.
तरीसुद्धा नवलनाथ तांबे यांनी या सर्व यंत्रणेला कोलून लावल्याचा आरोप त्या काळात उघडपणे होत होता.


भक्तांच्या पाकिटांवर डल्ला – दोन कोटींची लूट
साईबाबा संस्थान परिसरात पकडल्या जाणाऱ्या पाकीटमारांकडून जप्त होणारा मुद्देमाल न्यायालयात जमा न करता,
तो स्वतः हडप केल्याचा गंभीर आरोप नवलनाथ तांबे यांच्यावर होता.
सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम पाकीटमार व गुन्हेगारांकडून लुटल्याचे बोलले जात होते.
या काळात शिर्डी पोलीस स्टेशन जणू गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचे चित्र निर्माण झाले होते.
खाकी वर्दीची प्रतिमा समाजात अक्षरशः मालिन झाली होती.


कर्माचे फळ इथेच मिळते!
मात्र म्हणतात ना — कर्म केल्याशिवाय सुटका नाही.
नवलनाथ तांबे यांना त्यांनी केलेल्या कुकर्मांचे कर्मफळ याच जन्मात भोगावे लागले.
अत्यंत दयनीय अवस्थेत त्यांचे अंत झाले.
ही घटना केवळ एका व्यक्तीचा अंत नसून, साईबाबांच्या दरबारात अन्याय, लूट व भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी इशारा आहे.


दैनिक साई दर्शनकडून आवाहन
साईबाबांची भूमी ही श्रद्धा, सेवा आणि सत्कर्माची भूमी आहे.
येथे लोभ, लाच, लूट आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना कधीच माफी मिळत नाही.
पैसा व संपत्ती या नाशवंत वस्तू आहेत.
त्यासाठी क्रूरकर्म न करता, प्रामाणिकपणे सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा, हाच साईबाबांचा संदेश आहे.
नवलनाथ तांबे हे ताजे उदाहरण आहे –
साईच्या दरबारात कोणीही अन्याय करून सुटू शकत नाही.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button