शिर्डीतील कालिकानगर परिसरातील एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय.
यामुळे जवळपास 40 लाखांच्या नुकसानीची माहिती कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ दाखल होऊन आग विझवली. सध्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू असून, अधिक तपासासाठी स्थानिक अधिकारी घटनास्थळी आहेत.
एसएसएस डोअर फायबर गोडाऊनला आग लागल्याचं समजताच शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि साहित्य साठवलेलं असल्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका होता,
मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे आगीचा लोन रोखता आला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेमुळे जाधव यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कारखाना अगदी भरवस्तीत आहे आगीचे लोन जास्त प्रमाणात होते
त्याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि दरवाजे बनवण्याचे लिक्विडचे वास संपूर्ण परिसरात येते त्यामुळे तेथील रहिवासी ह्या वासाने ट्रस्ट झालेले आहेत
भर लोक वस्तीत ह्या दरवाज्यांचे कारखान्यास परवानगी दिली कोणी कि विना परवानगीनेच याठिकाणी हा कारखाना थाटला आहे याची चौकशी होऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊन हा कारखाना तेथून हलवावे अशी मागणी कालिका नगर येथील रहिवासी यांनी केली आहे