Letest News
शिर्डीत तरुणावर जीवघेणा हल्ला-तिघे हल्लेखोर फरार मोटारसायकलवरून येत चाकूने वार- दगडांनी मारहाण करत आ... एअरपोर्ट रोडवर रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा-५ जण रंगेहात पकडले अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष- धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप – तिघांविरुद्ध POCSO गुन्हा साईनगरीत वेषांतर गँगचा पर्दाफाश-ब्लेडने पर्स कापून चोरीचा डाव फसला! शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा संदेश- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रेरणादायी विचार “मोठ्या स्वप्नांच्या उंबरठ्यावर… साईचरणी सोनू सूद”साईबाबाच माझ्यासाठी पद्मश्री!” — सोनू सूद यांची भा... साईभक्तांकडून २० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका साई संस्थानच्या आरोग्यसेवेला नवे बळ ४१ कोटींचा स्फोट-१४ वर्षांचे लेखापरीक्षण संशयाच्या भोवऱ्यात-सत्य बाहेर काढण्यासाठी विशेष चौकशीची माग... ८.७० लाखांचे सोनं गायब-ज्येष्ठ महिलेची तक्रार-शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-तपासाला वेग शिर्डी शहरात देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
क्राईमशिर्डी

शिर्डीत तरुणावर जीवघेणा हल्ला-तिघे हल्लेखोर फरार मोटारसायकलवरून येत चाकूने वार- दगडांनी मारहाण करत आरोपी पसार

शिर्डी : शिर्डी शहरात उशिरा रात्री एक धक्कादायक घटना घडली. नमाज पठणासाठी आलेल्या तरुणावर अज्ञात तिघांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी तरुणाचे नाव दानिश नफीस चौधरी (रा. देवबंद) असे असून तो रमजान महिन्यानिमित्त तरावीह नमाज पठणासाठी शिर्डीत आला होता. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट संचलित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


⚔️ मोटारसायकलवरून आले, चाकूने वार करत दगडांनी मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश चौधरी हे शहरातील टाकी परिसरात फिरत असताना अचानक मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी चाकू काढून वार केले. दानिश खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी दगडांनी मारहाण करत त्यांच्या डोक्यावर व पायावर गंभीर दुखापत केली आणि तेथून फरार झाले.
जखमी दानिश यांनी सांगितले की, “मी नमाज पठणासाठी शिर्डीत आलो होतो. टाकी परिसरात गेलो असता अचानक तिघेजण बाइकवर आले आणि माझ्यावर हल्ला केला.”


🚨 घटनेनंतर पोलीस घटनास्थळी; सीसीटीव्ही तपासणी सुरू
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा तपास रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काडे व निवांत जाधव यांच्या पथकाकडून सुरू आहे.


🏛️ पोलीस ठाण्यासमोर जमाव; तात्काळ अटकेची मागणी
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर जमाव जमवत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “निर्दोष मुलावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत,” अशी मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे.
⚖️ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button