Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
अ.नगरक्राईम

समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली

ईडी च्या ताब्यात असलेल्या भोंदू खरातने अखेर मौन सोडत विशेष न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. “समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरूनच विविध खात्यांमध्ये पैसे जमा केले,” अशी धक्कादायक कबुली खरातने न्यायालयासमोर दिल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, खात्यांवरील नॉमिनीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत खरातने हात वर केले.
दि. २० रोजी मुंबई येथील विशेष पीएमएलए न्यायालयात खरातला हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी “तुमच्यावर नेमके काय आरोप आहेत, हे तुम्हाला समजतेय का?” असा प्रश्न विचारला असता, आतापर्यंत शांत असलेल्या खरातने प्रथमच भूमिका मांडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून येथे ९ टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला विविध अकाऊंटमध्ये पैसे ठेवण्याचा सल्ला दिला,” असे खरातने न्यायालयात सांगितले. त्यानुसारच आपण वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे त्याने स्पष्ट केले.मात्र, न्यायालयाने “जर सर्व व्यवहार नियमानुसार होते, तर या खात्यांना वारसदार (नॉमिनी) करण्यामागचे कारण काय?” असा सवाल उपस्थित करताच खरातने “त्याबाबत मला काहीच माहिती नाही,” असे उत्तर दिले. “आता तपास झाला आहे. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढेच मला माहिती आहे,” असे सांगत त्याने जबाब झटकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.


दरम्यान, खरातची ईडी कोठडी मंगळवारी (दि. २६) संपत असल्याने त्याला पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडी आणखी कोठडीची मागणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात ईडी ने मोठी कारवाई करत दि. १३, १४, १७, २३ एप्रिल तसेच ५ आणि १८ मे रोजी शिर्डी, राहाता, नाशिक, पुणे यांसह तब्बल १३ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत १३.९२ कोटी रुपयांची रोख रक्कम, ५००० अमेरिकी डॉलर, १.१२ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. तसेच २.२५ कोटींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉडरिंग झाल्याची शक्यता व्यक्त करण्या

त येत असून, ईडी त्या दिशेने सखोल तपास करत आहे. खरातच्या कबुलीनंतर आता समता पतसंस्थेतील नेमके कोण-कोण रडारवर येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button