Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
क्राईमशिर्डी

मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडलगत असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपावर काल (मंगळवार) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत आलेल्या चौघांनी मोठा धिंगाणा घालत पंपावरील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
🟥 “सिगरेट ओढू नका” म्हटल्यावर संताप; कर्मचाऱ्यावर तुटून पडले
मिळालेल्या माहितीनुसार, शहाड (मुंबई परिसर) येथील सत्येंद्र अनिल पवार हा आपल्या तीन साथीदारांसह चारचाकी वाहनातून सीएनजी भरण्यासाठी पंपावर आला होता.
सीएनजी भरत असतानाच संबंधित व्यक्ती सिगरेट ओढत असल्याचे पंपावरील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याने कर्मचाऱ्याने त्यांना “येथे सिगरेट पिऊ नका” अशी विनंती केली.
मात्र, या सूचनेचा राग येऊन पवार आणि त्याच्या साथीदारांनी संतापाच्या भरात कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🟥 ज्वलनशील ठिकाणी निष्काळजीपणा; मोठा अपघात टळला
सीएनजी पंपावर सिगरेट ओढण्याचा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. आरोपींच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तनामुळे मोठा स्फोट किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
या प्रकारामुळे पंपावरील इतर कर्मचारी व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
🟥 पोलिसांची धाव; चौघांना ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चौघांनाही ताब्यात घेतले. पंपावरील कर्मचारी संचेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


🟥 शिर्डीत वाढती दादागिरी? नागरिकांमध्ये नाराजी
या घटनेनंतर शिर्डी शहरात बाहेरून येणाऱ्या काही व्यक्तींकडून वाढत्या दादागिरीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. धार्मिक व शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
🟥 पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button