Letest News
72 तास उलटले… तरी गुन्हा नाही! शिर्डीत धर्मांतर प्रकरण गूढच” “हिंदुत्ववादी संघटना शांत का? शिर्डीत स... दैनिक साई दर्शनचा दणका! ‘मुंबई बिर्याणी’वर कारवाई – हॉटेल सील घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक! अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय? शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा! शिर्डीत वैद्यकीय चमत्कार! 15 किलोची प्रचंड गाठ यशस्वीरीत्या काढली थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!
राजकीयशिर्डी

निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्य बिनचूक पार पाडावेत – निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर

शिर्डी, दि. २७ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेवून विहित पद्धतीने कामे करावीत आणि निवडणूक प्रक्रिया बिनचूक पार पाडावी‌, अशा सूचना शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी विधानसभा मतदार संघाच्यावतीने राहाता येथे आयोजित निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या प्रथम सत्राला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, सुधाकर ओहळ आदी उपस्थित होते.

मतदानाची कार्यपद्धती सांगून श्री.आहेर म्हणाले की, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तिका याचे अवलोकन करून कामकाज पहावे. मतदान प्रक्रिया राबविताना काही अडचणी असल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

दिवसभरातील दोन सत्रात १३३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

सकाळ व दुपार असा सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम सत्रात ६०८ व द्वितीय सत्रात ७३१ अधिकारी – कर्मचाऱ्यांनी‌ प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

प्रशिक्षण सत्राच्या द्वितीय सत्राला अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व कोपरगाव निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी निवेदन केलेली प्रशिक्षणासाठीची चित्रफित उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button