Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
Blog

शिर्डीत आतिक्रमणाच्या नावाखाली मया जमवत गरिबांच्या डोळ्यात अश्रू आणणारा डोईफोडे लाचलुचपतच्या जाळ्यात जेरबंद होताच ढसाढसा रडला

शिर्डी प्रतिनिधी/
शिर्डी नगर परिषदेचा तात्कालीन मुख्याधिकारी लाचाखोर काक्या डोईफोडे याने शिर्डी येथे असतानाही काही बांधकामांना परवानगी देताना ज्या पद्धतीने अहमदपूर नगर परिषदे अधिकाऱ्याची मदत घेऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न केला त्याच धरतीवर शिर्डी नगर परिषदेतही काम करताना मोठ्या प्रमाणावर माया जमवल्याची मोठी चर्चा होती मात्र हे पैसे कमवण्यासाठी काहींनी मोठी मदत केल्याची दबक्या आवाजात चर्चा होती मात्र आता हा काक्या लाच लुचपत विभागाच्या कचाकड्यात सापडल्यामुळे त्याने आपल्या नोकरीच्या कालावधीत कोठे आणि कसे हरामाचे पैसे कमावले याची बारीकसारीक माहिती आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतली जात असल्यामुळे त्यांच्या सहवासातील मंडळी देखील रडार वर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिर्डी येथील निर्भिड असणारे दैनिक साईदर्शन याबाबत पाठपुरावा करणार असल्यामुळे शिर्डीत देखील त्याचे असलेले काही एजंटन्ना थंडी वाजून आल्याचे समजते अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेचे शिर्डी येथे तात्कालीन मुख्याधिकारी असलेले काक्या डोईफोडे व नगर रचनाकार विजयकुमार कस्तुरे यांना १४ फेब्रुवारी रोजी जमीन विकासाच्या कामापोटी ऑनलाइन चलन भरणा करूनही तांत्रिक कारणे दाखवून त्या कामापोटी तक्रारदाराच्या चारचाकी वाहनात पाच लाख रुपये घेताना नुकतेच पकडण्यात आले हा सापळा लाचलुचपत विभागाचे लातूर येथील पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ रामकुमार शिदे अप्पर पोलीस अधीक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिशय नियोजन पध्दतीने लावलेल्या सापळ्यात पैसे घेण्यासाठी आले असता चार चाकी वाहनात पैसे घेताना लाचलुचपत पथकाने जागेवरच पकडले व आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न देखील झाला दोघांना जेरबंद करताना झटापट देखील झाली मात्र लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची जाणीव होताच डोईफोडेचे डोळे भरून आले मात्र गोरगरिबांना शिर्डीत असताना आलीशान कॅबिन मध्ये बसुन आतिक्रमणाच्या नावाखाली अन्नात माती कालावणारा हा काक्या डोईफोडेला साईबाबानी दंडा कष्या पद्धतीने दाखवला हिच चर्चा दिवसभर दैनिक साईदर्शनने बातमी प्रकाशित केल्यानंतर सुरू होती डोईफोडे काम करताना साधा भोळा आव आणत होता त्याच्या नाजूक आंबट शौकीन छंदाची माहिती गोपनीय पत्राद्वारे दैनिक साई दर्शनकडे आली होती बातमीत तथ्य असताना महिलेचे तोड बंद करत कामगारांना पुढे करुण संपादक जितेश लोकचंदाणी वर गुन्हा दाखल करा यासाठी रोडवर कामगार उतरवणारा गजाआड होताच त्याच्या काही बगलबच्च्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी येथे असताना हारामाचे पैसे कसे कमावले त्यासाठी कोण मदत करत होते याची देखील माहिती घेऊन चौकशी केली जात असून शिर्डी सारख्या गावात जमीणीला व जागेला सोन्याचे मोल व भाव असताना किती हरामाचे पैसे कमावले असतील हे देखील पुढे येणार असून सर्व साधारण मराठवाड्यातील गरिब नगरपालिकेत पाच लाखाचा हात मारणारा डोईफोडे व गरिब नगर पालिकाचा रचनाकार हि परिस्थिती बघितली तर शिर्डीत किती माया कमावली असेल याचा विचार न केलेला बरा?
क्रमश

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button