Letest News
पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप...
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गावठी कट्यासह एकजण जेरबंद७० हजाराचा मुद्देमाल जप्त

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अमोल सिध्दार्थ दिवे, रा. शिर्डी हा गावठी कट्टा बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने हॉटेल राजेजवळ, कनकुरी रोड, नांदुर्खी रोड येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी सापळा रचुन संशयीत इसमास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अमोल सिध्दार्थ दिवे, वय २४ , रा. गोवर्धननगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून ५० हजार रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, १५०० रू किं. एक जिवंत काडतुस व वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकुण ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने नमूद अग्नीशस्त्र हे मुजम्मिल हारुन बागवान रा. श्रीरामपुर (फरार) याचेकडुन खरेदी करुन विक्रीकरीता आणल्याचे सांगितले. वर नमूद आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 158/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग, मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड यांनी केलेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button