Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

सावता हॉटेलवर व कानिफनाथ मंदिर मागील बारकाबाई हॉटेलवर वेश्या व्यवसाय करीत असतांना रंगेहात पकडले

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये हॉटेल ,लॉज मध्ये वेश्याव्यवसाय सर्रास सुरू असून नुकतेच शिर्डी मधील दोन हॉटेल ,लॉज मध्ये पोलिसांनी अचानक धाडी टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी येथील  कानिफनाथ चौक व पालखी रोडवरील सावता मंदिरासमोरील भरगच्च वरदळीच्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल सावता आणि कानिफनाथ मंदिराच्या मागील गल्लीत असणाऱ्या हॉटेल बारकाबाई या हॉटेलवर शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी व शिर्डीचे पोलीस निरीक्षक यांनी अचानक छापा टाकून देहविक्री करणाऱ्या हॉटेल चालकासह महिलांना घेतले आहे

.शिर्डी शहरातील साईबाबांची पालखी ज्या रस्त्याने निघते .त्या पालखी रोडवर अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय राजरोसपणे अनेक वर्षांपासून सुरु आहेत अनेकदा पोलिसांनी रेड टाकून आजपर्यंत अनेक हॉटेल चालकांसह हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.  तरीही त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती

शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी बनावट गिर्हाईक पाठवून वेश्याव्यसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे पालखी रोडवर सावता मंदिर आहे

आणि सावता मंदिरा समोरच  हॉटेल सावता  मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु होती आणि कानिफनाथ मंदिराच्या मागे हॉटेल बारकाबाई मध्ये सुद्धा वेश्या व्यवसाय करतांना महिलांसह चालकाला ताब्यात घेतले आहे.  हॉटेल सावता हि मंगेश शिंदे यांची

तर हॉटेल बारकाबाई हि संतोष कोते यांची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात. हे बघण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र सध्या शिर्डीत त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एक-दोन दिवसापूर्वीच शिर्डीत संगमनेर येथील तरुणींना शिर्डीत घेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे .पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आज या घटना उघडकीस आल्यामुळे शिर्डीत मोठी चर्चा सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button