Letest News
शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल
राजकीयशिर्डी

शिर्डीची कन्या भाग्यश्री जोगंस (गुरव) जालना महानगरपालिकेच्या नगरसेविका

शिर्डी | प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिर्डी शहराची कन्या भाग्यश्री सुजीत जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या दणदणीत यशामुळे शिर्डी शहरात तसेच गुरव समाजात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाग्यश्री जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास संपादन केला असून, जनतेने त्यांना महानगरपालिकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
त्या शिर्डी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत उर्फ नाना गुरव यांच्या पुतणी असून, स्वर्गीय दीपक गुरव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या राजकीय यशामागे कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि कार्यकुशलतेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.


विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगरसेविका भाग्यश्री जोगंस (गुरव) म्हणाल्या की,
“साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळेच हा विजय मिळू शकला. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठबळामुळे मला ही संधी मिळाली. जालना शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”

त्यांच्या या विजयाबद्दल शिर्डी व जालना परिसरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button