Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

साईबाबांच्या दक्षिणपेटीतून चोरी करणाऱ्या बा.ना. गोंदकर याच्याकडून दीड लाखांची रोख रक्कम हस्तगत!

शिर्डी ( प्रतिनिधी) साईबाबा संस्थानच्या लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब गोंदकर यांनी दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाल्यानंतर, या प्रकरणात पोलिसांनी त्वरित अटक कारवाई केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कालावधीत पोलिसांनी दीड लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बाळासाहेब गोंदकर यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतरत्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी घेतली असून, दोषीवर कठोर कारवाई केली जाईल

असे स्पष्ट केले होते. संस्थानने गोंदकर यांना नोकरीतूनही बडतर्फ केले आहे.गोंदकर अटकपूर्व फरार झाले होते. दरम्यान, त्यांचा अपघात झाल्याचे वृत्त असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले; मात्रयश न आल्याने ६ जून रोजी ते स्वतःहून शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाले.


जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी रामेश्वर कायदे यांनी चौकशी सुरू केली. गोंदकरने चोरीची कबुली दिली असून, पोलिसांनी दीड लाख रुपये हस्तगत केले आहेत. ही रक्कम लवकरच शासकीय कोषागारात जमा केली जाणार आहे.

चोरीत कोणी आजून सहकारी होते का, गोंदकरचा मोबाईल वापर कोणासोबत झाला, त्यांचा संवाद कोणासोबत झाला, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबरचे सीडीआर मागवण्यात आले आहेत. यामुळे नवीन धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button