Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
क्राईमशिर्डी

साईबाबा मंदिरात कॅश काऊंटिंग दरम्यान झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल 

शिर्डी  प्रतिनिधी : बाबांच्या झोळीत हात घालून चोरी करणारा कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नसल्याचा पुनरुच्चार साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


 शिर्डीत सर्वत्र साई मंदिरातील कॅश काउंटींगच्या वेळी झालेल्या चोरीची चर्चा सुरू होती. प्रत्येकाच्या तोंडी चोरी कशी झाली, त्यात कोणकोणाचा सहभाग असेल, त्याने खरच चोरी केली असेल तर त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल होईल की नाही किंवा हे प्रकरण दाबले जाईल, याबाबत तर्कवितांना उधाण आले होते. सत्य कधी बाहेर येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी तातळीने चौकशीचे आदेश दिले होते चौकशी अंती  बाळासाहेब नारायण गोंदकर यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर  अविनाश विनायक कुलकर्णी, वय 55 वर्षे धंदा नोकरी प्र. लेखाधिकारी श्री साईबाबा संस्थान .कर्मचारीने

शिर्डी पोलीस स्टेशनला दिनांक २९/०५/२०२५ रोजी  गुन्हा रजि नं  589/2025  भा. न्याय संहिता 2023 चे कलम-306,316(2),62 प्रमाणे  बाळासाहेब नारायण गोंदकर वय 58 वर्षे रा. शिर्डी ता. राहता. जि. अहिल्यानगर, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे 

   दिनांक 04/04/2025 ते दिनांक 25/04/2025 रोजी दरम्यान दक्षिणा मोजणी कक्ष, श्री साईबाबा शिर्डी संस्थान शिर्डी वरिल तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी  हे श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे लेखा शाखा विभागात शिपाई पदावर नोकरीस असुन ते मंदिरातील दक्षिणा मोजणी करिता हजर असतात.

तरी आरोपी याने सदर ठिकाणी नोकरीस असताना दक्षिणापेटीतील प्राप्त नोटाची विभागणीची काम करित असताना कोणालाही न कळेल आशा पध्दीतीने रक्कम अंदाजे 1,25,000/- ते 1,50,000/- चे दरम्यान चोरुन विश्वासघात केला आहे. तसेच या व्यतिरिक्त रक्कम अंदाजे 91500/- ते 96500/- रुपये चोरण्याचा प्रयत्न केला आहे. फिर्यादीद म्हटले आहे आरोपीला आजून अटक करण्यात आली नसल्याची माहिती तपासी अधिकारी कायंदे यांनी दिली आहे 

पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शखाली सपोनि  रामेश्वर कांयदे करीत आहेत 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button