Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांच्या दरबारात भक्तीबरोबरच आरोग्यसेवेच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा अधिक बळकट होत आहे. श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागासाठी तब्बल ४९ लाख रुपये किमतीचे ‘हाय स्पीड ड्रिल सिस्टीम फॉर न्यूरोसर्जरी’ हे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण देणगीस्वरूपात प्राप्त झाले आहे.
प्रिझ्मा ग्लोबल लिमिटेड यांच्या वतीने कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम अय्यर यांनी ही महत्त्वपूर्ण देणगी संस्थानला प्रदान केली. त्यामुळे श्री साईबाबा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाच्या वैद्यकीय क्षमतेत आणखी भर पडली आहे.
या अत्याधुनिक उपकरणाचे श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, न्यूरोसर्जन डॉ. संतोष उनवणे, डॉ. विश्वनाथ कामतगी, बायोमेडिकल इंजिनिअर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, कार्तिक पांगरकर, सहाय्यक अधीसेविका मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जरीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ
मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये हाय स्पीड ड्रिल सिस्टीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपकरणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेली अचूकता वाढण्यास तसेच उपचार अधिक प्रभावीपणे करण्यास वैद्यकीय पथकाला मदत होणार आहे.
श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणाऱ्या या अत्याधुनिक उपकरणामुळे गरजू रुग्णांना आधुनिक न्यूरोसर्जरी उपचारांच्या सुविधेला अधिक बळ मिळणार असून, संस्थानच्या आरोग्यसेवेतील आधुनिकतेच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


‘देणगी’तून आरोग्यसेवेला नवी ताकद!
श्री साईबाबांच्या चरणी अर्पण होणाऱ्या देणगीचा उपयोग समाजातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी होत आहे. ४९ लाखांचे अत्याधुनिक न्यूरोसर्जरी उपकरण ही केवळ वैद्यकीय साधनसामग्रीची देणगी नसून, गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी उपचाराच्या नव्या शक्यतांना बळ देणारे सेवाकार्य आहे. प्रिझ्मा ग्लोबल लिमिटेडच्या या योगदानातून ‘मानवसेवा हीच साईसेवा’ या भावनेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button