Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
क्राईमशिर्डी

ब्रेकिंग न्यूज | शिर्डी भर चौकात रक्तरंजित हल्ला; तरुणावर सपासप वार शिर्डी विमानतळ रोडवर दहशतीचे वातावरण

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा भडका उडाला असून भर चौकात तरुणावर सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डी विमानतळ रोडवरील अग्निशामक स्टेशनजवळ चौधरी नावाच्या तरुणावर अचानक काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकास घेरत धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ला इतका अचानक व भीषण होता की काही क्षणांतच चौकात आरडाओरड व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये भीती पसरली असून काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या युवकास तातडीने सुपर हॉस्पिटल, शिर्डी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत निरीक्षण ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या घटनेमुळे शिर्डीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिर्डी पोलीस पुढील तपास करत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button