Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
अ.नगरराजकीय

सातव्या वेतन आयोगाच्या आश्वासित प्रगती योजनेचे लाभ तात्काळ लागू करा-अन्यथा साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांचा साखळी उपोषणाचा इशारा

शिर्डी —
श्री साईबाबा संस्थानमधील कायम कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत (ACP/MACP) १०, २० व ३० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर मिळणारे आर्थिक लाभ तात्काळ लागू करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संघटनेच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

कर्मचाऱ्यांचे प्रलंबित हक्क तातडीने मंजूर करण्याची मागणी

संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ लागू होणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असूनही अद्याप ते प्रत्यक्षात अंमलात आलेले नाहीत. अनेक कर्मचारी १०, २० व ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत असूनही त्यांना आर्थिक प्रगतीपासून वंचित ठेवले जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

DN SPORTS

उद्या कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार

या मागणीसंदर्भात संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या, बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मंदिर परिसरातील साई सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन

हे निवेदन मंदिर परिसरातील साई सभागृह (हॉल क्रमांक ०) येथे देण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा साखळी उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button