Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

श्रद्धा सबुरी पतसंस्थेत मोठी कारवाई! २७८ कर्जदारांना नोटिसा – १४ कोटींची वसुली वेगात-

निमगाव कोऱ्हाळे येथील ‘श्रद्धा सबुरी पतसंस्था’तील ४१.९७ लाखांच्या गैरव्यवहारानंतर सात महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याची आता मोठी दणक्यात कारवाई सुरू झाली आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि राहाता सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक संजय पाटील यांनी थकीत कर्जदारांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

sai nirman
जाहिरात

१️⃣ अवघ्या दोन दिवसांत २७८ कर्जदारांना नोटिसा

एकूण १४ कोटी २४ लाखांच्या तारण कर्जासाठी २७८ कर्जदार व जामीनदारांना कलम १०१/९१ अंतर्गत न्यायालयीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वीही ३५० जणांना नोटिसा पाठवल्या आहेत.
पत्ता बदलला, फोन बदलले तरी फरक नाही – आधार कार्डच्या आधारे कर्जदारांचा शोध सुरूच.

DN SPORTS

२️⃣ कर्जदारांची मालमत्ता धोक्यात – बोझा चढणार!

थकीत कर्ज भरणे बंधनकारक असून, पुढील टप्प्यात सहकार खात्याच्या माध्यमातून जमीन, घर, शेतावर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्रशासक संजय पाटील यांनी स्पष्ट सूचना दिली—

“कर्ज भरा, नाहीतर थेट कोर्टीन कारवाई टाळता येणार नाही!”


३️⃣ सहा गावांचा आर्थिक कणा हादरला – ठेवीदार हतबल

निमगाव कोऱ्हाळे व आसपासच्या सहा गावांतील शेतकरी, कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे व्यावसायिक यांचे लाखो रुपयांचे ठेवी संचालकांच्या बोगस कर्ज, आर्थिक गैरव्यवहारामुळे अडकून पडले आहेत.
लोकांची आयुष्यभराची कमाई लटकलेली असून, ठेवीदार अस्वस्थ व संतापलेले आहेत.

kamlakar

४️⃣ तपास LCB कडे – ठेवीदारांचे डोळे निकालाकडे

या प्रकरणाचा तपास सध्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे (LCB) चालू आहे. पुढील अटक, जप्ती, मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button