Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

गुन्हेगारांच्या अंत्यविधीवर संताप – पण जिवंत गुन्हेगारांवर मौन का? विखे पाटिल यांना नागरिकांचा सवाल?

गुन्हेगाराच्या मृत्यूनंतर नैतिकतेचे डोस, पण जिवंत गुन्हेगारांवर मौन का?
नामदार विखे यांच्या भूमिकेवर स्वतःच्या मतदारसंघातच जनता संभ्रमात 

sai nirman
जाहिरात

राहाता–शिर्डी / श्रीरामपूर | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
श्रीरामपूर येथील एका कुख्यात गुन्हेगाराच्या मृत्यूनंतर झालेल्या अंत्यविधीवर
“हा अंत्यविधी नव्हे, गुन्हेगारीची मिरवणूक आहे”
असा संतप्त इशारा देत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाजाला नैतिकतेचे धडे दिले.
मात्र या कडक वक्तव्यानंतरच, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात – राहाता–शिर्डी परिसरात एक अस्वस्थ करणारा प्रश्न पेटून उठला आहे —
“जर गुन्हेगारीविरोधात एवढीच राग आहे, तर राहाता इथे उघड सुरू असलेल्या गुन्हेगारीवर गप्पी का?”
हा सवाल आता राजकीय टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या तोंडून रस्त्यावर व्यक्त होऊ लागला आहे.
मृत गुन्हेगारांवर संताप, जिवंत गुन्हेगारांवर मौन का?
राहाता–शिर्डी परिसरात गेल्या काही महिन्यांत — अपहरण
अमानुष हत्या
खुलेआम मटका–जुगार गुटखा तस्करी 
गुन्हेगारांची दहशत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हे सगळे घडत असताना
राजकीय आक्रमकता कुठे गायब होते?
नैतिकतेची तलवार इथे बोथट का होते?
नागरिक थेट विचारत आहेत —
“गुन्हेगार जिवंत असताना मौन, आणि मेल्यावर संताप — ही कुठली नैतिकता?”
  जनतेत खळबळजनक चर्चा
शहरात आता उघड चर्चा सुरू आहे —
बाहेरच्या तालुक्यात नैतिकतेची ढाल
कॅमेऱ्यासमोर कडक शब्द
पण स्वतःच्या मतदारसंघात सोयीचं मौन
नागरिक संतप्त शब्दांत म्हणत आहेत —
“दुसऱ्यांच्या गुन्हेगारांवर तोंडसुख, पण आपल्या अंगणात माजलेल्या गुन्हेगारांवर हात आखडता?”
“निवडक संताप म्हणजेच निवडक राजकारण!”
अवैध धंद्यांचा पैसा कुणाच्या डोक्यावर छत्री धरतो?
आजही राहाता–येथे  — बिंगो–मटका
जुगार अड्डे
अवैध व्याजव्यवसाय
गुटखा विक्री
हे सर्व राजरोसपणे सुरू आहे.
पोलीस ठाण्याच्या हाकेवर धंदे चालतात, आणि तरीही कारवाई शून्य — हे वास्तव धक्कादायक आहे.
मग प्रश्न उभा राहतो —
एवढ्या निर्ढावलेल्या गुन्हेगारांना धाडस कुणाच्या बळावर येते?
राजकीय छत्रछायेशिवाय हे शक्य आहे का?
ही चर्चा आता दबक्या आवाजात नाही, तर चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत उघडपणे सुरू आहे.
पोलीस यंत्रणा दबावाखाली?
जिल्ह्यात कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकारी असतानाही — खालच्या पातळीवर कारवाईचा अभाव
निवडक धडक
वेळकाढूपणा
यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का?
की “वरून दबाव, खाली दुर्लक्ष” अशी स्थिती निर्माण झाली आहे?
नागरिक आता थेट विचारू लागले आहेत —
“पोलीस कायद्याच्या बाजूने आहेत की सत्तेच्या?”
निवडक नैतिकता समाजासाठी घातक!
सामाजिक कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत — गुन्हेगार जिवंत असताना गप्प राहणं
मृत्यूनंतर नैतिकतेचे ढोल बडवणं
हे नेतृत्वाचं लक्षण नाही, तर दुटप्पीपणाचं लक्षण आहे
आज जर राहाता–शिर्डीतील गुन्हेगारी रोखली गेली नाही,
तर उद्या आणखी निष्पाप जीव जातील —
आणि त्याची जबाबदारी कोण घेणार?
जनतेचा थेट इशारा – आता कृती हवी, भाषण नको!
नागरिकांच्या स्पष्ट मागण्या — स्वतःच्या मतदारसंघात तात्काळ मोक्का
सर्व अवैध धंद्यांवर बुलडोझर कारवाई
पोलीस–गुन्हेगार साटेलोट्याची चौकशी
“निवडक संताप” थांबवा
नाहीतर उद्या जनतेचा रोष रस्त्यावर उतरेल,
अशी स्पष्ट चेतावणी आता ऐकू येत आहे.
 नागरिकांचा  थेट सवाल
गुन्हेगाराच्या अंत्यविधीवर बोलणं सोपं असतं
पण जिवंत गुन्हेगार मोडून काढणं धाडसाचं असतं
हे धाडस नामदार विखे सुजय विखे दाखवणार का ? 
हा प्रश्न आज संपूर्ण मतदारसंघ विचारतो आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button