Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
Blog

नेहमीच अनेकांना प्रसिद्धी देत जातो !अन् प्रसिद्धी देणाराच उपेक्षित राहतो !!

हल्ली विविध डिजिटल प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात आगेकुच करत आहे,त्यात दैनिके, सांयदैनिके,साप्ताहिक पाक्षिक, मासिके वर्तमानपत्रांसोबत ईपेपर्स/ न्यूज पोर्टल्स/स्थानिक वृत्त वाहिन्या / वेब पोर्टल्स अशी अनेक प्रसार माध्यमे ही मार्केट मध्ये प्रचंड प्रमाणात आगेकुच करत असताना आजच्या युगात क्षणात जगाची खबर- बातमी मानसाला आपल्या मोबाईलवर प्राप्त होत आहे.
मात्र विविध प्रसार माध्यमातून मोबाईलवर आलेल्या बातम्यांमध्ये जी सत्यता असते ती इतर व्यक्तीगत कोणी व्यक्तीश: टाकलेल्या बातम्यांत नसते,त्यावर विश्वास करुन खरे मानण्यात अर्थही नसतो,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


कारण शासनमान्य नोंदणीकृत प्रसार माध्यमांना जबाबदारी असते म्हणून ते जबाबदारीनेच वृत संकलित आणि प्रकाशित करतात,याकरीता कधीही प्रिंट मिडियातील (प्रिंट केलेले वर्तमानपत्र) सत्यता ही परिपूर्ण मानली जाते, शिवाय अधिकृत न्यूज पोर्टल्स आणि अधिकृत वृत्तवाहिन्या / वेब पोर्टल्स हे देखील विश्वास पात्रच असतात.
मात्र ती अधिकृत तथा नोंदणीकृत असली पाहिजेत,याकरीता कोणतेही आपल्या आवडीचे वर्तमानपत्र आपण दररोज सकाळीच खरेदी करुन जरुर वाचावेच शिवाय आपल्या परिवारातील सदस्यांनी देखील वाचावयास सांगावे, यामुळे बातम्यांची सत्यता कळते सोबत वाचन संस्कृती वाढतेच वाढते आणी वाचन क्षमताही वाढते हे खुपच महत्वाचे आणी गरजेचे आहे.

kamlakar


तसेच आपल्या हक्काचे स्थानिक प्रसार माध्यमे आणि पत्रकार, संपादक हे आपल्या विविध विषयांकीत स्थानिक विविध सामाजाभिमुख उपक्रमाच्या आगदी ताज्या आणि फ्रेश बातम्यांना तात्काळ प्रसिद्धी देतात,आहोरात परिश्रम घेत नेहमी सर्वांच्या बातम्या आपल्या विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित करुन सर्वांना मोठे करण्यासाठी तथा सर्वांना न्याय देण्यासाठी कायम सेवातत्पर असतात, मात्र हे सर्व करत असताना कोणीच त्यांच्या प्रसार माध्यमांना स्वतः हुन जाहिरात स्वरुपी सहकार्य करण्यास पुढे धजावत नाही,
जसे प्रत्येकाचे बातम्या आणि फोटो प्रसार माध्यमातून तात्काळ झळकावे अशी इच्छा,अपेक्षा बाळगणारे कधी त्या प्रसार माध्यमांसाठी लागणाऱ्या साधन सामग्री करीता जाहिरात स्वरुप मदतीचा हात पुढे करतांना मग का म्हणून कमी पडतात ?
का स्वतः हुन समजून घेत नाही की सदासर्वदा आपल्या विविध विधायक कार्यांच्या बातम्या या संबंधीत प्रसार माध्यमे विनामूल्य प्रकाशित करतात तर आपणही जरासं मोठं मन करत त्या प्रसार माध्यमांकरीता यथाशक्ती जाहिरात स्वरुपी कधी मदतीचा हात पुढे धरण्यात का मागे सरतात ?,


याबाबत साधा विचार देखील करण्यास कोणी तयार नसेलतर मग अनेकांना आपल्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणारा हा जो महत्वाचा घटक आहे तो उपेक्षित नव्हेतर काय असु शकणार? म्हणून तर वरील प्रमाणे म्हणावेसे वाटते की ‘नेहमीच अनेकांना प्रसिद्धी देत जातो, अन् प्रसिद्धी देणाराच उपस्थित राहतो, असे म्हटल्यास गैर ते काय?
आता सन २०२३ ला आपण गुडबाय करत सन २०२४ या नुतन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत,बऱ्याच शाळा, महाविद्यालयात वार्षिक संमेलने, तर कोणाचे दिनदर्शिका प्रकाशने, कोणाला राज्यस्तरीय पुरस्कार तर कोणाची विशेष निवड आदी विषयांकीत बातम्यांसोबत आपला फोटोही चांगल्या प्रकारे आणि उत्तमरित्या प्रसार माध्यमातून झळकावा,आपली सर्वत्र वाह.. वा..व्हावी, अशी प्रत्येक मान्यवरांची रास्त इच्छा असणे तसे स्वभावीकच मात्र ज्या प्रसार माध्यमातून हे ठळकपणे झळकणार आहे,त्याचाही विचार कधी कोणी करणार का? त्या प्रसार माध्यमास जाहिरात स्वरुपी मदतीचा हात पुढे धरणार का?,

जर आपण आपल्या हक्काची प्रसार माध्यमे आपण मानत असाल तर आपलंही कर्तव्य बनतं की आपण आपल्या हक्काच्या प्रसार माध्यमांना वर्षाकाठी का असेना किमान एखादी हजार रुपयांची तरी जाहिरात स्वरुपी मदत करावी, ज्यामुळे त्या प्रसार माध्यमांच्या वार्ताहर, संपादक मंडळास आर्थिक पाठबळ मिळाल्याने ते देखील सक्षम आणि पॉवरफुल होतील तथा मग आपली बातमी देखील अग्रक्रमाने पहील्या पानावर घेतील. अधिकृत याकरीता स्थानिक वर्तमानपत्र/ न्यूज पोर्टल्स,वेब पोर्टल्स, स्थानिक वृत्तवाहिन्या आदिंच्या पत्रकार/संपादकांना त्यांनी न मागता आपण स्वतः हुन आपल्या जवळच्या आणि आपल्या हक्काच्या प्रसार माध्यमास जाहिरात स्वरुप मदत करणे हे आपले देखील कर्तव्यच आहे.
यामुळे आपले आपसातील स्नेह अधिक वृद्धिंगत होतील आणि आपली बातमी विनाविलंब प्रकाशित देखील केली जाईल. करीता याबाबी विचार व्हावा ही माफक अपेक्षा.
आपला

  • शौकतभाई शेख
    संस्थापक अध्यक्ष
    स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
    श्रीरामपूर – मोबा: 9561174111

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button